IBPS-Bank-Po 
एज्युकेशन जॉब्स

संधी नोकरीच्या : बँकिंग क्षेत्रातील परीक्षा जाहीर

वंदना धर्माधिकारी

स्टेट बँकेने ऑफिसर्स पदासाठी अर्ज मागवले असून ते २७ जुलै ते १६ ऑगस्ट २०२० कालावधीत ऑनलाइन करायचे आहेत. इच्छुकांनी वेबसाइटवरून अधिक माहिती घ्यावी. काही सहकारी बँका देखील ‘आयबीपीएस’मार्फत नोकरभरती करतात. काही बँका फक्त परीक्षा करून घेतात आणि मुलाखती स्वत: घेतात.  राष्ट्रीयकृत १७ बँकांमध्ये नोकरभरतीचे काम आयबीपीएस-शासकीय स्वायत्त भारतीय संस्था करते. त्यांच्यामार्फत नोकरभरतीसाठी सामान्य प्रवेश परीक्षा (CWE : Common Entrance Exams) घेतल्या जातात. निवडप्रक्रिया एकुणात तीन प्रकारे घेतली जाते. प्राथमिक परीक्षा (Preliminary exam),  मुख्य परीक्षा (Main exam.) आणि मुलाखत (Interview). त्यानुसार निवड झाल्यावर बँकेकडून नियुक्तिपत्र देण्यात येते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बँकेत नोकरीसाठी आवश्यक पात्रता 

  • भारतीय नागरिक असलेल्यांनाच फक्त घेतले जाते 
  • वय : क्लार्क २० ते २८ वर्षे : ऑफिसर २० ते ३० वर्षे 
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पास 

यामध्ये बीसी/एसटी/ओबीसी; शारीरिक अपंग, माजी सैनिक अशा व इतर काहींना सवलती आहेत. प्रत्येकाने www.ibps.in या वेबसाइटवर सर्व तपशील बारकाईने बघून आपला ऑनलाइन अर्ज भरावा. फॉर्म भरतानाच फी भरायची असते. फॉर्म भरण्यापूर्वी वेबसाइटवर दिलेल्या सर्व सूचना, माहिती बघितल्याशिवाय पुढे जाऊ नये. 

यंदाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच घोषित झाल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे
रिजनल रुरल बँक्स 
RRB : Regional Rural Banks  
परीक्षा : १३, १९ सप्टेंबर २०२० 

प्रोबेशनरी ऑफिसर 
प्राथमिक परीक्षा : ३, ४, १० ऑक्टोबर २०२० 
मुख्य परीक्षा : २८ नोव्हेंबर २०२०. 
क्लार्कस् : प्राथमिक परीक्षा : १२,१३,१९ डिसें. २०२०
मुख्य परीक्षा : २४  जानेवारी २०२१ 

स्पेशल ऑफिसर 
प्राथमिक परीक्षा : २०,२७ डिसेंबर२०२० 
मुख्य परीक्षा : ३० जानेवारी २०२१

पुस्तकाचे नाव - Sakal Comprehensive Guide to IBPS Bank PO/ Clerks & LIC Prelim + Main Exam (English)
प्रकाशक : सकाळ प्रकाशन
लेखक : वंदना धर्माधिकारी, संतोष वडक, आम्रपाली औरंगाबादकर, कृष्णा कुलकर्णी, वल्लरी धर्माधिकारी
किंमत : ३०० रुपये
पृष्ठे : २९६ 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT