House Work Is Work
House Work Is Work  
एज्युकेशन जॉब्स

नोकरी सोडलेल्या महिलांना 'ही' बँक देते पुन्हा संधी, लवकर भरा अर्ज

सकाळ डिजिटल टीम

अॅक्सिस बँकेने ‘हाउस वर्क इज वर्क’ (House Work Is Work) या उपक्रमाची सुरूवात केली आहे. बँक या उपक्रमातंर्गत अशा महिलांना संधी देत आहे ज्यांना पुन्हा आपले प्रोफेशनल करिअर सुरु करायचे आहे.

काही कारणांवरून नोकरी सोडलेल्या महिलांना अॅक्सिस बँक पुन्हा संधी देत आहे. प्रायव्हेट सेक्टरच्या या मोठ्या बँकेने यासाठी ‘हाउस वर्क इज वर्क’ (House Work Is Work) योजना सुरुवात केली आहे. म्हणजे घरकाम देखील काम आहे हे विचाराला ही बँक पाठिंबा देत आहे. या उपक्रमातंर्गत त्या महिलांना बँक जॉब ऑफर करत आहे ज्यांना पुन्हा आपले करिअर सुरु करायचे आहे. या महिलांना त्या अजूनही नोकरी मिळवू शकतात आणि त्यांच्यमध्ये कौशल्य आहे की बँकेमध्ये कित्येक प्रकारचे काम करण्यासाठी पात्र आहे हा विश्वास देण्यासाठी बँके हा उपक्रम राबवित आहे.

अॅक्सिस बँकेअंतर्गत Axis Bank प्रेसिडेंट आणि एचआर हेड राजकमल वेमपति यांनी बँकने या नविड योजने(House Work Is Work)बाबत सांगितले की, अशा महिला ज्या पारंपारिक जबाबदाऱ्या आणि इतर काही कारणांमुळे नोकरी सोडत आहे आणि आता पुन्हा नोकरी करण्यासाठी तयार आहे आणि त्यांना पुन्हा नोकरी देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पात्रता

कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमध्ये किंवा कॉलेजमधून पदवीधर असणे ही महत्त्वाची अट आहे.

नोकरी संबधीत कौशल्य

  1. नोकरीची इच्छा असलेल्या लोकांसाठी महिलांमध्ये कमीत कमी स्किल्स असले पाहिजे.

  2. चांगले संवाद कौशल्य(तोंडी आणि लेखी)

  3. दबावाखाली आणि वेळेवर काम पूर्ण करण्याची क्षमता

  4. टीम वर्क करण्यासाठी रुची आणि कौशल्या असले पाहिजे.

  5. Android/ iOS व्हर्जन एक मोबाईल फोन असला पाहिजे.

योजनेला मिळतोय चांगला प्रतिसाद

राजकमल वेमपती म्हणाले, "बँकेच्या या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक महिला आहेत ज्यांना पूर्णवेळ आणि बँकेच्या शाखांमध्ये काम करायचे आहे. त्यामुळे आम्हाला महिलांसह सर्वांसाठी GIG-A सह प्रत्येक फॉरमॅट खुले करायचे आहे.

GIG-A संधी हे अॅक्सिस बँकेचे नवीन व्यासपीठ आहे जे चांगल्या प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी एक मॉडेल म्हणून काम करते. त्याच वेळी लवचिकता, विविधता आणि समावेशाचे आश्वासन देते. यासाठी आतापर्यंत तीन हजारांहून अधिक रिझ्युमे प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. या उत्कृष्ठ प्रतिसादाच्या पार्श्‍वभूमीवर बँकेने अधिक ओव्हरटाईमसाठी भरती मर्यादा वाढवली आहे.

किती पगार मिळेल?

पगाराच्या बाबतीत, अॅक्सिस बँक अशा कर्मचार्‍यांचा पगार त्यांच्या नोकरी, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे निश्चित करेल. वेमपती म्हणाले की, नोकरी महत्त्वाची आहे. अशा कर्मचाऱ्यांचे इम्प्लॉई बेनिफिट नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT