Balbharti Kishor  google
एज्युकेशन जॉब्स

Balbharti Kishor : बालभारतीचं 'किशोर' आजही का आहे वाचकांसाठी लाडकं ?

आपल्याकडे किशोरवयीन वाचकवर्ग बहुतांशी दुर्लक्षित राहिला आहे. अशा या वर्गावर वाचनाचे संस्कार व्हावेत आणि त्यांचे मनोरंजनही व्हावेत यासाठी या मासिकाची निर्मिती केली जाते.

नमिता धुरी

मुंबई : महाराष्ट्रातील तळागाळात पोहोचून घराघरांत शिक्षण पोहोचवणाऱ्या बालभारतीचा आज स्थापना दिवस आहे. केवळ पाठ्यपुस्तके तयार करून बालभारती थांबली नाही तर मुलांना अवांतर वाचनाची गोडी लावण्यासाठी १९७१ सालापासून किशोर हे मासिक प्रकाशित केले जात आहे. (Balbharti Kishor)

किशोर हे ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी चालवण्यात येणारे मासिक आहे. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान देणे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार करणे ही या मासिकाची उद्दिष्टे आहेत. हेही वाचा - ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

किशोरवयीन शालेय विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला अनुसरून किशोर मासिकातील मांडणी केलेली असते. यात विशेषकरून मुलांसाठी लिहिल्या गेलेल्या कथा, कविता, लेख, चित्रे यांचा समावेश असतो.

आपल्याकडे किशोरवयीन वाचकवर्ग बहुतांशी दुर्लक्षित राहिला आहे. अशा या वर्गावर वाचनाचे संस्कार व्हावेत आणि त्यांचे मनोरंजनही व्हावेत यासाठी या मासिकाची निर्मिती केली जाते.

सध्याच्या पिढीचा इंग्रजी माध्यमाकडे असलेला कल, तंत्रज्ञानात अडकलेली पिढी अशा स्थितीत मराठी बालवाचक कमी झाला आहे. परिणामी लहान मुलांसाठी प्रकाशित करण्यात येत असलेली अनेक नियतकालिके बंद पडली आहेत.

अशा स्थितीतही किशोरची लोकप्रियता मात्र टिकून आहे. लहान मुलेच नाहीत तर त्यांचे पालकही स्मरणरंजनासाठी किशोरचा पर्याय निवडत आहेत.

बदलत्या पिढीशी जुळवून घेत ज्याप्रमाणे बालभारतीने आपली पाठ्यपुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत त्याप्रमाणेच किशोरचेही अंक ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत.

अगदी १९७१ साली निघालेल्या पहिल्या अंकापासून ते २०२२ पर्यंतची सर्व अंक उपलब्ध आहेत. https://kishor.balbharati.in/Archives/Index.aspx या संकेतस्थळावरून या अंकांच्या पीडीएफ प्रती मोफत डाऊनलोड करता येतात. (how to get old kishor ank )

टाळेबंदीमुळे घरात अडकून पडलेल्या मुलांसाठी आणि पालकांसाठी किशोर वरदान ठरले. या काळात वाचनासाठी पुस्तके उपलब्ध होत नसताना किशोरला मात्र लाखो डाऊनलोड्स मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT