बॅंक ऑफ बडोदा Sakal
एज्युकेशन जॉब्स

बॅंक ऑफ बडोदामध्ये 'या' पदांची सुरू आहे बंपर भरती!

बॅंक ऑफ बडोदामध्ये 'या' पदांची सुरू आहे बंपर भरती!

सकाळ वृत्तसेवा

बॅंक ऑफ बडोदाच्या वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागात विविध पदांसाठी भरती मोहीम आयोजित केली आहे.

सोलापूर : बॅंक ऑफ बडोदा (Bank of Baroda - BOB) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत (Recruitment). या अंतर्गत बॅंकेला सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. आता नोंदणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, अर्जदारांनी त्वरित अर्ज भरावा. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, अर्ज करण्यासाठी शेवटच्या वेळेपर्यंत वाट पाहू नका, कारण अधिकृत पोर्टलवरील लोड वाढल्यामुळे त्यांना अनेक वेळा फॉर्म भरण्यात अडचणी येऊ शकतात.

बॅंक ऑफ बडोदाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 376 रिक्त पदांपैकी सिनिअर रिलेशनशिप मॅनेजरच्या 326 पदे आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजरच्या 50 पदांसाठी भरती होणार आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बॅंक ऑफ बडोदाच्या वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागात या रिक्त पदांसाठी भरती मोहीम आयोजित केली जात आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 19 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाली आहे.

ही आहे वयोमर्यादा

सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी पात्र उमेदवारांची वयोमर्यादा किमान 24 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावी. ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी उमेदवाराचे वय 23 ते 35 वर्षे दरम्यान असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलता असेल.

असे असेल अर्जासाठी शुल्क

सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर आणि ई-वेल्थ मॅनेजर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल आणि ओबीसी उमेदवारांना 600 रुपये तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, राज्यपाल रात्री अचानक गेले राज्याबाहेर; काँग्रेससमोर पेच?

Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT