BARTI 
एज्युकेशन जॉब्स

UPSC मुलाखतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनो, 'बार्टी' देणार आर्थिक सहाय्य

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत, अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम 25 हजार रुपये आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी आणि अनुसूचित जातीचा असावा. उमेदवार लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.

अर्ज करण्यासाठी बार्टीच्या संकेतस्थळावरील अर्ज भरावा. अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, उमेदवारांचे बँक खाते क्रमांक (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) आणि त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्राच्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2021 आहे. पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी 020- 26343600 किंवा 26333339 या क्रमांकावर संपर्क साधावा.

“बार्टीमार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्यू घेतला जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल,” अशी माहिती बार्टीमार्फत देण्यात आली.

- अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT