Agniveer Scheme Recruitment google
एज्युकेशन जॉब्स

Agniveer Scheme Recruitment : बीईजी येथे अग्नीवीर योजने अंतर्गत होणार भरती प्रक्रिया

भारतीय सैन्यदलात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी सैन्यदलातर्फे अग्नीवर योजने अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अक्षता पवार

पुणे - भारतीय सैन्यदलात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी सैन्यदलातर्फे अग्नीवर योजने अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) येथे होणार आहे. याबाबतची माहिती सैन्यदलातर्फे देण्यात आली आहे.

अग्नीवर योजने अंतर्गत होणारी ही भरती प्रक्रिया २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान पुरुष उमेदवारांसाठी तर २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत महिला उमेदवारांसाठी होणार आहे. हा भरती मेळावा महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांसह दमन आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील तरुणांसाठी असेल.

यामुळे तरुणांना सैन्यदलात भरती देशसेवा करण्याची संधी मिळेल. यामध्ये १० वी आणि ८ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अग्नीवर जनरल ड्यूटी, तांत्रिक, लिपिक अशा विविध विभागांसाठी ही भरती केली जाणार आहे. तसेच महिला उमेदवारांसाठी लष्करी पोलिस विभागात भरती प्रक्रिया राबवली जाईल.

दरम्यान बीईजी येथे आयोजित केलेला हा भरती मेळावा राज्यातील पुणे, नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी असेल. तर ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे सैन्यदलाच्या वतीने त्यांच्या संबंधित ई-मेलवर पाठविण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजेच प्रवेशपत्र आणि भरतीसाठी आवश्‍यक ती कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच या भरती मेळाव्यात सहभागी होता येणार असल्याचे आवाहन सैन्यदलातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Price: सणासुदीत नागरिकांना दिलासा; गॅस सिलिंडर झाला स्वस्त, नवीन दर काय?

Mahadevi Elephant: अनंत अंबानीच्या लग्नात हत्तीण तीन दिवस एकाच ठिकाणी उभी... महादेवीचे देखील हाल होणार? पेटाकडे उत्तर आहे का?

Latest Marathi News Updates : कर्नाटकने आलमट्टी धरणाची उंची वाढवू नये - मुख्यमंत्री फडणवीस

Nagpur Crime: लुटेरी दुल्हन पोलिसांच्या जाळ्यात; गिट्टीखदान पोलिसांकडून अटक, डझनभर लोकांना अडकवून केली लूट

Nagpur News: १२ हजार घरांमध्ये आढळल्या डेंगी अळ्या; शहरात वाढत्या डेंगी, मलेरियाने मनपा सतर्क, ‘ब्रिडिंग चेकर्स’ सक्रिय

SCROLL FOR NEXT