Best apps to learn English from Marathi 
एज्युकेशन जॉब्स

मराठीतून फाड फाड इंग्लिश बोलायला शिकवणारे पाच अ‍ॅप्स

शरयू काकडे

English Learning from Marathi: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात, घरी बसून इंग्लिश शिकणे खरोखरच सोयीचे झाले आहे. केवळ घरीच नाही तर कुठेही - प्रवास करताना किंवा कॉफी शॉपमध्ये बसूनही तुम्ही इंग्लिश शिकू शकता.कसे? तुमच्या हातात असलेल्या मोबाईलद्वारे. तुम्हाला इंग्लिश(English) शिकायचे असेल तर तुम्हाला इंग्लिश शिकवणारे कित्येक अ‍ॅप (English learning apps) मोबाईलवर मिळतील. पण आता तुम्ही मराठीतून इंग्लिश शिकवणाऱ्या ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही सहज इंग्लिश शिकू शकता. (Best apps to learn English from Marathi)

इंग्लिश शिकणे म्हणजे फक्त ऑनलाईन व्याकरणाचे नियम शिकणे एवढेच नाही तर इंग्लिश बोलण्यासाठी एक पार्टनर देखील मिळतो, किंवा इंग्लिश शिकणारा दुसरा व्यक्ती ज्यासोबत तुम्ही इंग्लिश भाषेचा सराव करू शकता. पण सध्या आव्हानात्मक गोष्ट ही आहे की, इंटरनेटवर हजारो इंग्लिश शिकण्यासाठीचे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, परंतु तुम्हाला सर्वोत्तम इंग्लिश शिकणारे अ‍ॅप निवडावे लागेल. एक इंग्लिश शिक्षण अ‍ॅप जे तुम्हाला खरोखर फायदेशीर ठरू शकते.

मराठीतून इंग्लिश शिकवणारे ॲप – Best Apps to Learning English From Marathi in India

ग्रामरली (Grammarly App)

हे अॅप इंग्लिश शिकणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या लेखनात होणाऱ्या चूका टाळू शकता किंवा आणखी प्रभावीपणे लिहू शकता. कित्येकदा इंग्लिश भाषेत लिहताना व्याकरणामध्ये काही चूका होतात, त्या सुधारण्यासाठी हे अॅप मदत करते. क्रोम, फायरफॉक्स, सफारी आणि एजसाठी ग्रामरलीचे ब्राउझर एक्सटेशन उपलब्ध आहे. तसेच आपल्या आयफोनवर, iOS साठी आणि Android साठी ग्रामरलीच्या कीबोर्डही तुम्ही वापरू शकता ज्या तुमच्या इंग्लिश भाषेतील चूका सुधारू शकते

लर्न इंग्लिश इन मराठी (Learn English in Marathi App)

लर्न इंग्लिश इन मराठी या ॲपमार्फत तुम्ही मराठी भाषेतून धडे घेऊन उत्तम इंग्लिश बोलायला शिकू शकता. इंग्लिशच्या मूलभूत व्याकरणापासून आणि शब्दांपासून ते वाक्ये रचनेपर्यंत, तुम्हाला सर्व काही येथे उपलब्ध आहे. तुम्ही अ‍ॅपच्या मदतीने स्वत: इंग्लिश बोलण्याचा सराव करू शकता.

स्पोकन इंग्लिश इन मराठी (Spoken English in Marathi App)

या ॲपमार्फत तुम्ही मराठी भाषेतून धडे घेऊन उत्तम इंग्लिश शिकू शकता. इंग्लिशच्या मूलभूत व्याकरण आणि उदाहरणांसह सर्व माहिती उपलब्ध आहे. मॉडेल व्हर्ब आणि प्रश्नार्थक शब्दांबाबत माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीद्वारे स्वत: इंग्लिश बोलण्याचा सराव करू शकता.

इंग्रजी शिका (Learn English App)

इंग्रजी शिका या अ‍ॅप द्वारे तुम्ही मराठी भाषेतून इंग्लिशचा धडे घेऊ शकता आणि सरावा करू शकता. या अ‍ॅपमध्ये व्याकरण, काळ, शब्दसंग्रह आणि दैनिक शब्द, भाषांतर, लेख, संभाषणे, वाक्यप्रचार/ शब्दसमुह, म्हणी, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, अनऔपचारिक इंग्लिश, प्रश्न मंजुशा, इंग्रजी टिप्स असे पर्याय उपलब्ध आहे. या सर्वांचा अभ्यास करून तुम्ही नक्कीच इंग्लिश शिकू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Supply: हॉटेलचे जेवण महागणार! व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; सर्वसामान्यांना झटका

तुमचे Google अकाउंट कोणत्या Unknown डिव्हाइसवर लॉगिन आहे? तपासून लगेच करा डिलीट..पाहा स्टेप-बाय-स्टेप गाइड

T20 WC, IND vs NZ: फायनलमध्ये अहमदाबादची खेळपट्टी कोणाला मदत करणार? समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

UPSC success story : यूट्युबवर ऑनलाईन व्हिडिओ पाहून कोल्हापूरच्या आरुषा पाटीलने युपीएसीमध्ये मिळवलं यश, तुम्हीही म्हणालं...

Baba Khan: धाड.. धाड.. धाड.. घरावर बेछूट गोळीबार; घटनेत पोलीसही जखमी, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरसोबत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT