Jobs_BHEL 
एज्युकेशन जॉब्स

BHEL Recruitment 2020: 'भेल'मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा ८० हजार!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited BHEL)ने अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. तरुण-तरुणींसाठी आयोजित या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण सात पदे भरली जाणार आहेत.

यापैकी ५ पदे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ग्रुपमध्ये असून एक पदे कॉर्पोरेट फायनान्स ग्रुपमध्ये आहे, तर आणखी एक पद कॉर्पोरेट एचआर ग्रुपमध्ये आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.bhel.com किंवा www.careers.bhel.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ३१ डिसेंबर २०२० ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेनंतर अर्ज करता येणार नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे ही भरती एका वर्षाच्या कालावधीसाठी होत आहे. मात्र, जास्तीत जास्त कार्यकाळ तीन वर्षांपर्यंत राहिल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ग्रुपमध्ये अर्ज करणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. यासह उमेदवारांना दोन वर्षाचा कामाचा अनुभवही असावा.

असा करा अर्ज - 

- सर्वप्रथम उमेदवारांनी www.careers.bhel.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. 
- आता आवश्यक माहिती द्या आणि लेटेस्ट स्टेटस लिंकवर लॉगिन करावे. 
- आता तुमची कागदपत्रे अपलोड करा. 
- या नंतर ऑनलाईन अर्ज भरा आणि सबमिट करा. 
- अर्ज दोन टप्प्यात भरावा लागेल, हे उमेदवारांनी लक्षात ठेवले पाहिजे. 
- त्यानंतर या अर्जाची प्रिंटही काढा.

या पदांसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल. पहिल्या मुलाखतीतून निवडलेल्या उमेदवारांना आणखी एका मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा ८० हजार रुपये वेतन देण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी उमेदवारांनी वेबसाइटला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी सर्व अधिकृत सूचना वाचा.

BHELच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे  क्लिक करा. 

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : पुण्याला पावसाने झोडपलं

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT