bmc tax news sakal
एज्युकेशन जॉब्स

BMC New Advertisement: मुंबई महापालिकेच्या 1,846 लिपिकपदांसाठी निघाली नवी जाहिरात; 'ती' अट झाली रद्द

या जाहिरातीसाठी राज्यभरातून हजारो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण एका जाचक अटीमुळं अनेकांना अर्ज भरता आला नव्हता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) (Clerk) पदासाठी 1,846 जागांच्या भरती जाहिरात महिन्याभरापूर्वी निघाली होती. या जाहिरातीसाठी राज्यभरातून हजारो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण एका जाचक अटीमुळं अनेकांना अर्ज भरता आला नव्हता. याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

याविरोधात अनेक राजकीय नेत्यांनी आवाजही उठवला होता. त्यामुळं आता महापालिकेनं यात महत्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पुन्हा जाहिरातीत बदल करुन ती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळं आता जे उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहिले होते त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

नव्या जाहिरातीनुसार, येत्या पंधरा दिवसांत पुन्हा भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यामध्ये यापूर्वी या जाहिरातीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्यााची गरज नाही. त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत, असं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. लिपिक संवर्गातील रिक्त पदं सरळसेवेनं भरण्यासाठी 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. पण आता नव्या जाहिरातीनुसार 21 सप्टेंबर २०२४ पासून अर्ज भरता येणार असून ११ ऑक्टोबर २०२४ पर्यंत शेवटची तारीख असणार आहे.

'ती' अट रद्द केल्यानं मोठा दिलासा

या भरतीसाठी उमेदवार दहावी आणि पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा अशी शैक्षणिक अर्हता लागू होती. आता आलेल्या विविध सुचनांनुसार ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. त्यामुळं आता नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

नवी जाहिरात अशी...

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 'कार्यकारी सहाय्यक (लिपिक)' पदांच्या एकूण 1,845 रिक्त जागा भरण्यासाठी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करायचे आहेत.

  • पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक (लिपिक)

  • पदसंख्या – 1,845 जागा

  • शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात पाहावी)

  • वयोमर्यादा – 18 – 43 वर्षे

  • नोकरी ठिकाण – मुंबई

  • वेतन - Rs. 25,500/- to 81,100/-

अर्ज शुल्क –

  • खुल्या वर्गासाठी – रु. 1000 /-

  • आरक्षित वर्गासाठी – रु. 900/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2024

  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT