JEE Advanced Exam Reschedule esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Advanced परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख जाहीर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE Advanced 2022 पुढे ढकलण्यात (JEE Advanced Exam Reschedule) आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई आता 28 ऑगस्ट रोजी JEE Advanced 2022 परीक्षा घेणार आहे. यापूर्वी जेईई परीक्षा ३ जुलैला होणार होती.

जेईई परीक्षेचे नवीन वेळापत्रक jeeadv.ac.in. या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी या वेबसाईटला सातत्याने भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

जेईई अॅडव्हान्समध्ये दोन पेपर होणार आहेत.

  • पेपर १ वेळ : 09:00-12:00 IST

  • पेपर २ वेळ : 14:30-17:30 IST

सप्टेंबरमध्ये निकाल -

उमेदवारांची उत्तरपत्रिका १ सप्टेंबरला वेबसाईटवर उपलब्ध असेल. त्यानंतर ३ सप्टेंबरला तात्पुरत्या उत्तर पत्रिका वेबसाईटवर दिसेल. ११ सप्टेंबरला अंतिम उत्तरपत्रिक पाहायला मिळतील. जेईई अॅडव्हान्सचा निकाल देखील ११ सप्टेंबरलाच घोषित होणार आहे.

JEE Main जून-जुलैमध्ये -

NTA ने यापूर्वी JEE Main एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा जून आणि जुलैपर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. आता नवीन वेळापत्रकानुसार, जेईई मेनचे पहिले सत्र २० ते २९ जून, तर दुसरे सत्र २१ ते ३० जुलैदरम्यान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मृणाल दुसानिसने अमेरिका का सोडली? सांगितलं खरं कारण; म्हणाली, 'आमचं नवीन लग्न झालेलं तेव्हा...'

Toxic Cough Syrup: पेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा खोकल्याच्या औषधात वापर? १४ हुन अधिक मुलांचा मृत्यू

Fadnavis Interview: मोदींना आंबा, तर फडणवीसांना संत्रा… अक्षय कुमार पुन्हा ट्रोल; मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर!

ऐश्वर्याचं सुपरहिट 'कजरा रे' गाणं गाणाऱ्या गायिकेला मिळालेलं निव्वळ इतकं मानधन; म्हणाली "माझी किंमत नाही"

Leopard Attack Sangli : आजोबांसोबत शेतात गेलेल्या ४ वर्षीय आरववर बिबट्यानं मारला पंजा अन्.., नातवाला वाचवण्यासाठी आजोबा बनला 'छावा'

SCROLL FOR NEXT