BSF Recruitment 2022 google
एज्युकेशन जॉब्स

BSF Recruitment 2022 : दहावी-बारावी उत्तीर्णांना BSFमध्ये सेवेची संधी

हेड कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय १८ आणि कमाल वय २५ असावे.

नमिता धुरी

मुंबई : बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर (RO) आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक (RM) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण १ हजार ३१२ पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२२ आहे. (BSF Head Constable Recruitment 2022)

एकूण पदे - १,३१२

वय मर्यादा

हेड कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय १८ आणि कमाल वय २५ असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज

अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील, तर SC, ST आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. लक्षात घ्या की अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.

शैक्षणिक पात्रता

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आयटीआय प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान ६० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात ६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलासाठी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात.

असा करा अर्ज

१. - अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जा.

२. - त्यानंतर होमपेजवर, “रिक्रूटमेंट” पर्यायावर क्लिक करा.

३. - आता एक लिंक असेल "ऑनलाइन अर्ज करा", त्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व आवश्यक तपशील भरा.

४. - तपशील भरल्यानंतर, ऑनलाइन मोडद्वारे अर्ज शुल्क भरा.

५. - फॉर्म पूर्ण झाल्यानंतर, त्याची प्रिंट काढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT