ICAI CA Result 2021
ICAI CA Result 2021 esakal
एज्युकेशन जॉब्स

CA Final Result 2021 : सीए फायनल, फाऊंडेशनचा निकाल जाहीर

बाळकृष्ण मधाळे

CA Final Result 2021 : सीए फायनल आणि फाउंडेशनचा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाद्वारे (ICAI) जाहीर करण्यात आला आहे. आयसीएआयने जारी केलेल्या नोटिसीत म्हटलंय, की, जुलै 2021 मध्ये आयोजित जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमाचा अंतिम आणि पायाभूत निकाल 13 सप्टेंबर किंवा 14 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर केला जाईल, असं स्पष्ट केलंय.

सीए फायनल आणि फाउंडेशनचा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाद्वारे जाहीर करण्यात आला आहे.

सीए फायनल आणि फाउंडेशन परीक्षेला बसणारे उमेदवार आयसीएआयच्या वेबसाइटवर icai.org अधिकृत सूचना पाहू शकतात. अधिकृत सूचनेनुसार, अंतिम (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) आणि फाउंडेशन परीक्षेच्या उमेदवारांना निकाल (ICAI CA Result 2021) ईमेलवर हवा असेल, तर त्यांना icaiexam.icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

असा तपासा निकाल

  • स्टेज 1 : निकालासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला icaiexam.icai.org भेट द्यावी.

  • स्टेज 2 : आता वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

  • स्टेज 3 : त्यानंतर विनंती केलेली माहिती सबमिट करून लॉगिन करा.

  • स्टेज 4 : तुमचा निकाल आता स्क्रीनवर दिसेल.

  • स्टेज 5 : तो आता तपासा.

  • स्टेज 6 : भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटही काढू शकता.

आपण 'या' वेबसाइट्सवर निकाल पाहू शकता

icaiexam.icai.org

caresults.icai.org

icai.nic.in

ईमेलवर मिळवा सीएचा निकाल

आयसीएआयनं विद्यार्थ्यांच्या ईमेल आयडीवर सीए निकाल 2021 पाठविण्याची व्यवस्था केलीय. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे सीए अंतिम निकाल किंवा सीए फाउंडेशन निकाल 2021 त्यांच्या ईमेल आयडीवर प्राप्त करायचा असेल, तर त्यांनी सीए परीक्षा पोर्टलला icaiexam.icai.org भेट देऊन विनंती नोंदवावी लागेल. यानंतर संस्था नोंदणीकृत ईमेलवर या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल आणि स्कोअर कार्ड पाठवेल. निकाल आणि स्कोअर कार्ड पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर, त्यांना आपला नोंदणी क्रमांक अथवा पिन व रोल क्रमांक सादर करावा लागेल, असंही संस्थेनं स्पष्ट केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT