Nursing Career tips google
एज्युकेशन जॉब्स

Nursing Career : बारावीनंतर करिअरसाठी नर्सिंगचा पर्याय आहे उत्तम

तुम्ही साडेतीन वर्षांचा जनरल नर्स मिडवाइफरी (GNM) कोर्सही करू शकता.

नमिता धुरी

मुंबई : हेल्थ केअर सेक्टरबद्दल बोलायचे झाले तर डॉक्टरांव्यतिरिक्त तुम्ही नर्स बनूनही लोकांची सेवा करू शकता. सेवा, सहिष्णुता आणि समर्पण या गुणांसह रुग्ण आणि दुःखितांची सेवा करण्याची तुमची तळमळ असेल, तर तुमच्यासाठी नर्सिंग हा सर्वोत्तम करिअर पर्याय आहे. जगभरातील परिचारिकांसाठी नोकरीच्या असंख्य संधी आहेत.

परिचारिका होण्यासाठी सेवा आणि समर्पण या गुणांसोबतच नर्सिंगशी संबंधित अभ्यासक्रमही करणे आवश्यक आहे. नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप आणि ट्रेनिंगच्या मदतीने या करिअरशी संबंधित व्यावहारिक गोष्टींची चांगली माहिती मिळवता येते. (career after 12th how to be nurse career in nursing )

नर्सिंग करिअरची सुरुवात कशी करावी (Nursing course information)

परिचारिका बनण्याची इच्छा असणारे लोक वेगवेगळ्या स्तरांवरून याची सुरुवात करू शकतात. यासाठी ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ/हेल्थ वर्कर (एएनएम) कोर्स (नर्सिंग कोर्स) करता येईल. या पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षांचा असून किमान पात्रता दहावी उत्तीर्ण आहे.

याशिवाय तुम्ही साडेतीन वर्षांचा जनरल नर्स मिडवाइफरी (GNM) कोर्सही करू शकता. त्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात ४० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

याशिवाय नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशनही करता येते. यासाठी किमान पात्रता ४५ टक्के गुणांसह इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात बारावी उत्तीर्ण अशी आहे. यासाठी तुमचे वय किमान १७ वर्षे असणे आवश्यक आहे.

कोर्ससाठी किती खर्च येईल (Nurse course fees)

नर्सिंग शिक्षणाचा खर्च संस्थेवर अवलंबून असतो. सरकारी आणि सरकारी अनुदानित महाविद्यालये खासगी संस्थांपेक्षा कमी शुल्क आकारतात.

BSC नर्सिंग कोर्ससाठी खासगी संस्था वार्षिक शुल्क ४० हजार ते १ लाख ८० हजारपर्यंत आकारतात. येथे GNM कोर्सची फी ४५ हजार ते १ लाख ४० हजारपर्यंत आहे. सरकारी महाविद्यालयांमध्ये फी कमी आहे.

नोकरीच्या संधी

नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर, सरकारी किंवा खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आरोग्य गृह, इतर विविध उद्योग आणि संरक्षण सेवांमध्ये प्रशिक्षित नर्सेससाठी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत. त्याचबरोबर परदेशातही भारतीय परिचारिकांची मागणी वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT