Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : करियरमध्ये आता पुढे काय? असा प्रश्न पडत असेल तर लगेच फॉलो करा या टिप्स

जेव्हा आयुष्यात अनिश्चितता सतावते तेव्हा आता पुढे काय असा प्रश्न पडतोच. विशेषतः करिअरच्या बाबतीत.

धनश्री भावसार-बगाडे

Career Guidance Personality Development Tips : प्रत्येकच जण आपल्यासाठी चांगल्या करिअरचे स्वप्न बघत असतो. सध्या १०वी, १२वीचे निकाल लागत आहेत. मुलं आपापल्या करिअरच्या वाटा निवडत आहेत. आयुष्यात प्रगती व्हावी असं सगळ्यांनाच वाटतं. पण भविष्यातली अनिश्चितता कोणालाही माहित नसते. अशा वेळी आपण स्वतःला प्रिपेअर्ड ठेवणं आवश्यक असतं.

अॅमेझॉन, फेसबूक, गुगलसारख्या मोठ्या कंपन्यासुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाण कर्मचारी कपात करतात अशा बातम्या येतात. त्यामुळे करिअरची चिंता सतावणे फारच स्वाभाविक आहे. पण मग हा ताण एवढा वाढतो की, त्याचा परिणाम वैयक्तीत आयुष्यावरही दिसून येतो. त्यामळे जर तुम्हालाही नोकरी जाण्याची भीती किंवा ही अनिश्चितता त्रासदायक ठरत असेल तर काही उपाय सुचवत आहोत.

स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा - या भीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे की, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तेव्हाच तुम्ही आयुष्यात चांगले काहीतरी करू शकाल. कधी कधी चिंता, भीती आपल्यावर एवढी हावी होते की आपण हे विसरून जातो की आपल्यात किती आणि काय क्षमता आहेत. जेव्हा स्वतःवरचा विश्वास डळमळी होतो त्यावेळी आपण स्वतः स्ट्रेसमध्ये राहतो. गोष्टींचे नीट नियोजन करू शकत नाही.

नवे काही शिकत रहावे - वेगात बदलणाऱ्या या काळात तुम्हीही नवनवीन गोष्टी सतत शिकत राहणे आवश्यक असते. वेळ येईल तेव्हा बघू असा दृष्टीकोन ठेवू नये. स्वतःला नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवावे. यामुळे तुमच्यात आत्मविश्वास येईल आणि तुम्ही काळाप्रमाणे अपडेट राहू शकाल. काळानुसार नव्या गोष्टी शिकल्याने तुमची भीती संपून जाईल.

कंट्रोलबाहेरच्या गोष्टींवर एनर्जी खर्च करू नका - पहिलेतर तुम्हाला स्वतःशी हे मान्य करायला हवं की प्रत्येक गोष्ट तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे ज्या गोष्टींवर कंट्रोल नाही त्यावर एनर्जी वाया घालवू नका. या भीतीतून बाहेर पडण्यासाठी फक्त त्याच गोष्टींवर फोकस करा ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत.

स्वतःवर प्रेम करा - जेव्हा तुम्ही कुठल्या ताणात किंवा भीतीमध्ये वावरत असतात तेव्हा तुम्हा सहसा स्वतःवर लक्ष देणं बंद करतात. तुम्ही असं करू नये. याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होतो. त्यामुळे तुम्ही गोष्टींवर फोकस करू शकत नाहीत. यामुळे वेळ वाया जातो आणि स्ट्रेसही वाढतो. त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला कधीही विसरू नये.

दूरदृष्टी आणि निरीक्षण शक्ती - दूरदृष्टी आणि बारीक निरीक्षण शक्ती असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे या गोष्टीची क्षमता असावी की, जे काम करत आहात त्यावर बारीक लक्ष असावे. शिवाय जे काम करत आहात त्याचा येणाऱ्या काळात तुमच्यावर काय परिणाम होणार याचाही विचार असावा. भविष्यावर होणारा परिणाम ओळखण्यासाठी दूरदृष्टी असावी. त्यासाठी आज उचललेल्या पावलांवर लक्ष ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT