‘ॲक्चुरिअल सायन्स’मधील करिअर sakal
एज्युकेशन जॉब्स

‘ॲक्चुरिअल सायन्स’मधील करिअर

आजच्या धकाधकीच्या जीवनात विमा हा परवलीचा शब्द आहे. मग तो आरोग्यविमा असो किंवा अपघात, वाहने, दागिने अशा विविध प्रकारातही विमा संरक्षण आपल्याला मिळते, तसेच पैसे गुंतवणूक, निवृत्तीवेतन यासाठीदेखील विविध योजनांच्या जाहिराती दिसतात. मग या विम्याच्या, गुंतवणुकीच्या योजना कोण तयार करतं?

प्रा. रूपाली काळे

आजच्या धकाधकीच्या जीवनात विमा हा परवलीचा शब्द आहे. मग तो आरोग्यविमा असो किंवा अपघात, वाहने, दागिने अशा विविध प्रकारातही विमा संरक्षण आपल्याला मिळते, तसेच पैसे गुंतवणूक, निवृत्तीवेतन यासाठीदेखील विविध योजनांच्या जाहिराती दिसतात. मग या विम्याच्या, गुंतवणुकीच्या योजना कोण तयार करतं? ही आर्थिक जोखीम, आर्थिक परतवा, विमा प्रीमियम कोण ठरवतं? या योजना तयार करणाऱ्यांना विमाशास्त्रज्ञ (ॲक्चुरी) म्हणतात, तर या शास्त्राला विमाविज्ञान (ॲक्चुरिअल सायन्स) असं संबोधलं जातं. गणित व संख्याशास्त्राचा वापर करून योजना तयार होतात.

पात्रता

बारावी पास विद्यार्थी ACET म्हणजेच या अभ्यासक्रमासाठीची १०० गुणांची प्रवेश परीक्षा देऊ शकतो. त्यामध्ये सांख्यिकी, गणितविषयक परीक्षा उत्तीर्ण होऊन अ‍ॅक्चुअरी सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्राथमिक अर्हता प्राप्त करून घेऊ शकतो. अ‍ॅक्चुअरीज इंडिया या संस्थेची सभासदत्वाची परीक्षा आणि अनुभव यांच्या जोरावर विद्यार्थी अ‍ॅक्चुअरी सायन्स या शाखेचा पदवीधर होऊ शकतो. अभ्यासक्रम हा प्रामुख्याने इंग्रजी, गणित, सांख्यिकी, तर्कशास्त्र आणि डेटा इंटरप्रिटेशन या ५ विषयांभोवती फिरतो. विद्यार्थी दुसरी पदवी घेत हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. अ‍ॅक्चुअरिअल नोकरी करतानासुद्धा अभ्यासक्रमाशी निगडित परीक्षा देत हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. इतर पदवी परीक्षा देतदेखील हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.

कोण करू शकतं?

ज्या विद्यार्थ्यांना गणितात गती आहे, आवड आहे, ज्यांची तार्किक बुद्धिमत्ता उत्तम आहे ते विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात. भारतात केवळ ४५८ रजिस्टर्ड ‘अ‍ॅक्चुअरी आहेत (इंटरनेटवरील माहिती). एल. एस. वैद्यनाथन हे भारताचे पहिले विमाशास्त्रज्ञ होते. ‘आयएआय’ ही संस्था प्रशिक्षण देण्याचं काम करते.

कामाचे स्वरूप

‘अ‍ॅक्चुअरी’- म्हणजे असा गणितज्ज्ञ जो विमा पॉलिसीची किंमत, प्रीमियमचा दर, जोखीम व्यवस्थापन, गुंतवणूक व्यवस्थापन, लाभांशाची तजवीज याविषयीची भाकिते व्यक्त करतो. त्यानुसार कंपनीला प्रीमियमचा दर ठरवण्यास माहितीपूर्वक निर्णय घेण्यास सल्ला देतो, योजना तयार करतो.

अभ्यासक्रमाचे टप्पे

ॲक्चुरिअल सायन्स अभ्यासक्रम चार टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. Core Practice, Core Principle, Specialised Practice, Specialised Application to become an actuary. सर्व मिळून एकूण १३ परीक्षा असतात. त्यापैकी १० परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘असोसिएट’ म्हणून नोकरी मिळू शकते. तसेच, तीन आणि सहा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही नोकरी मिळू शकते. शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी भारतात आणि ब्रिटनमध्ये जास्त आहेत. याविषयी अधिक माहिती एलआयसी कार्यालयात किंवा www.actuariesindia.org, www.actuaries.org.uk, www.casact.org, www.soa.org या संकेतस्थळांवर मिळेल.

नियमित अभ्यासक्रम

  • बी.एस्सी. (अ‍ॅक्चुरिअल सायन्स) : बारावीनंतर प्रवेश

  • एम.बी.ए. (अ‍ॅक्चुरिअल सायन्स) : कालावधी २ वर्षे

  • डिप्लोमा इन अ‍ॅक्चुरिअल सायन्स : डी.एस. अ‍ॅक्चुरिअल एज्युकेशन सर्व्हिसेस, मुंबई

  • (लेखिका एमआयटी कनिष्ठ महाविद्यालय, कोथरूड येथे प्राध्यापिका आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar on Parth Pawar land deal case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अखेर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

TET Exam 2025: टीईटी संदर्भात शिक्षक परिषदेचे महत्वाचे आवाहन;...तर नुकसानीस उमेदवार जबाबदार राहतील

Pune Protest : 'टीईटी' च्या सक्तीविरोधात शिक्षक संघटनांची वज्रमूठ; २४ नोव्हेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्याचा निर्णय!

Hybrid learning in MBA : एमबीए आणि पीजीडीएममधील हायब्रिड शिक्षण मॉडेल्सचा उदय: संधी आणि आव्हाने

Elon Musk : फडणवीसांनी घडवला इतिहास! Starlink चं इंटरनेट सगळ्यांत पहिलं महाराष्ट्रात.. इलॉन मस्कच्या कंपनीसोबत झाला करार

SCROLL FOR NEXT