Air Hostess Career option after 12th Esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : बारावीनंतर बनू शकता एअर होस्टेस! काय असतं काम, किती मिळतो पगार? जाणून घ्या

After 12th Career Options: १२वी पास झाल्यानंतर यासाठी सर्टिफिकेट, डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स करता येतो.

Sudesh

After 12th career options: एअर होस्टेस या कामाचं आकर्षण कितीतरी तरुणींना असतं. सध्या एव्हिएशन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळेच, एअर होस्टेसच्या मागणीतही वाढ झाली आहे.

एअर होस्टेस होण्यासाठी काय करावं लागतं, त्यांचं काम काय असतं, आणि त्यांना पगार किती मिळतो याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

एअर होस्टेस होण्यासाठी तुम्ही बारावीनंतर प्रयत्न करू शकता. १२वी पास झाल्यानंतर यासाठी सर्टिफिकेट, डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स करता येतो. या सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्सेसचा कालावधी सहा महिन्यांपासून एक वर्षांपर्यंत असू शकतो. तर, डिग्री कोर्स तीन ते चार वर्षांचा असतो.

कोण बनू शकतं?

एअर होस्टेस होण्यासाठी काही क्रायटेरिया फॉलो करावा लागतो. तुमची उंची कमीत कमी ५.२ फूट असायला हवी. तसेच, तुम्ही फिजिकली फिट असणे गरजेचे आहे.

तुमचं वय १७ ते २६ वर्षांच्या आत असावं, आणि अर्ज करताना तुम्ही अविवाहित असणं गरजेचं आहे. या सर्व अटींची पूर्तता होत असेल, आणि तुमच्याकडे यासंबंधित डिप्लोमा किंवा डिग्री सर्टिफिकेट असेल तर तुम्ही एअर होस्टेस होऊ शकता.

असं होतं सिलेक्शन

एअर होस्टेस पदावरील भरतीसाठी विमान कंपन्या जाहिरात प्रसिद्ध करतात. यानंतर अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू या टप्प्यांमधून एअर होस्टेसची निवड केली जाते.

काय असतं काम?

एअर होस्टेसच्या कामांमध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. यामध्ये विमानातील प्रवाशांचे स्वागत करणे, त्यांना त्यांच्या सीटपर्यंत नेणे, फ्लाईट सुरू असताना त्यांच्या शंकांचे निराकरण करणे, प्रवाशांना फूड-बेव्हरेजेस देणे, फ्लाईट रिपोर्ट तयार करणे, गरज भासल्यास प्रवाशांना वैद्यकीय मदत पुरवणे आणि प्रवाशांना सेफ्टी प्रोसीजरबद्दल सूचना देणे अशी कामे एअर होस्टेसला करावी लागतात.

किती मिळतो पगार?

एका फ्रेशर एअर होस्टेसचा सुरुवातीचा वार्षिक पगार चार ते पाच लाख रुपये असतो. अनुभव वाढल्यानंतर, इन्क्रिमेंट आणि प्रमोशन झाल्यानंतर हा पगार वर्षाला १३ ते १५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT