एज्युकेशन जॉब्स

सीबीएसई सीटीईटी अधिसुचना; सिलॅबस आणि पॅटर्न लवकरच होणार लागू

सकाळ वृत्तसेवा

अकोला: लाखो उमेदवार सीबीएसई सीटीईटी अधिसूचनेच्या प्रतिक्षेत आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच अधिसूचना (सीटीईटी 2021 अधिसूचना) दिली जाऊ शकते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर उमेदवार सीटीईटीच्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतील. सीटीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते- नोव्हेंबर आणि जुलैमध्ये. मागील वर्षी सुमारे 23 लाख उमेदवारांनी सीटीईटीसाठी अर्ज केले होते. (CBSE CTET notification; Syllabus and pattern will be implemented soon)

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना शिकवण्यासाठी सीटीईटी म्हणजेच केंद्रीय शिक्षण पात्रता परीक्षा पास करावी लागेल. या परीक्षेत दोन पेपर आहेत. पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना शिकवण्यासाठी तुम्हाला पहिला पेपर पास करावा लागेल. इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांना शिकवण्यासाठी दुसरा पेपर आहे.

पेपर -१ - सीटीईटीच्या पेपर -१ मध्ये येण्यासाठी उमेदवार किमान 50 % गुणांसह १२ वी उत्तीर्ण असावा. याव्यतिरिक्त, दोन वर्षांचा डिप्लोमा देखील आवश्यक आहे.

पेपर २- प्राथमिक शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा असलेल्या कोणत्याही विषयात पदवी.

सीटीईटी पेपर नमुना आणि अभ्यासक्रम (पेपर -1)

30 मुलांचे विकास आणि अध्यापनशास्त्राचे प्रश्न

भाषा -१ 30 प्रश्न (अनिवार्य)

भाषा -२ 30 प्रश्न (अनिवार्य)

गणिताचे 30 प्रश्न

पर्यावरणीय अभ्यासाचे 30 प्रश्न

परीक्षेची वेळ 150 मिनिटे आहे.

एकूण गुण 150

एकूण प्रश्न 150

CBSE CTET notification; Syllabus and pattern will be implemented soon

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT