CBSE 10 class Term 1 Result 2022  esakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE 10 वी टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर

सकाळ डिजिटल टीम

सीबीएसईनं 10 वी टर्म 1 चा निकाल जाहीर केला आहे.

CBSE 10 class Term 1 Result 2022 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशननं (CBSE) 11 मार्च रोजी 10 वी टर्म 1 चा निकाल (CBSE Term 1 Result) जाहीर केलाय. परंतु, विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकत नाहीत. अहवालानुसार, सीबीएसईनं (Central Board of Secondary Education) शाळांना मेलद्वारे निकाल पाठवलाय. दरम्यान, विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळांशी संपर्क साधून आपला निकाल पाहू शकतात. स्कोअरकार्डमध्ये विषयनिहाय गुणांचा तपशील असू शकतो, असं समजतंय. अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे गुण तपासता येतील.

यावेळी सीबीएसईनं अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केलेला नाही. यापूर्वी संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, लवकरच 10 वी टर्म 1 चे निकाल देखील अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी निकाल जाहीर करण्याची मागणी करत होते. त्यानंतर CBSE नं विद्यार्थ्यांचे निकाल शाळांना (CBSE Term 1 10th Result) मेलद्वारे पाठवले आहेत.

12 वीचा निकाल लवकरच जाहीर होणार

दहावीच्या निकालानंतर आता बारावीचा निकालही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबीएसईनं 11 मार्चच्या टर्म 2 च्या परीक्षांचे डेटशीटही प्रसिद्ध केले आहेत. या परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होतील, तर तारीखपत्रक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर संपूर्ण टाइम-टेबल वेबसाइटवर डाउनलोड केलं जाऊ शकतं (CBSE Term 2 Time-table). तसेच डेटशीटचे अधिक तपशील देखील दिले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT