CBSE Board esakal
एज्युकेशन जॉब्स

90 मिनिटांच्या ऑफलाइन मोडमध्ये होतील CBSE टर्म-1 च्या परीक्षा!

90 मिनिटांच्या ऑफलाइन मोडमध्ये होतील सीबीएसई टर्म-1 च्या परीक्षा!

श्रीनिवास दुध्याल

इयत्ता दहावी-बारावीसाठी टर्म-1 बोर्ड परीक्षा ऑफलाइन घेतली जाईल. तर सीबीएसई 18 ऑक्‍टोबर रोजी डेटशीट जारी करेल.

सोलापूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education - CBSE) टर्म एक परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टर्म एक परीक्षा ऑफलाइन घेतली जाईल. त्याचबरोबर इयत्ता दहावी, बारावीची डेट शीट 18 ऑक्‍टोबर रोजी जारी केली जाईल. बोर्डाने सांगितले की, किरकोळ विषयांची परीक्षा प्रथम घेतली जाईल, त्यानंतर प्रमुख विषयांची परीक्षा घेतली जाईल.

बोर्डाने म्हटले आहे, की सर्व परीक्षा ऑफलाइन असतील. त्याचबरोबर पीटीआयनेही ट्‌विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. यानुसार, इयत्ता दहावी - बारावीसाठी टर्म- 1 बोर्ड परीक्षा ऑफलाइन घेतली जाईल. तर सीबीएसई 18 ऑक्‍टोबर रोजी डेटशीट जारी करेल.

टर्म 1 परीक्षेसंदर्भात मंडळाने सांगितले आहे की, प्रत्येक परीक्षा 90 मिनिटांच्या कालावधीची असेल. हिवाळी अधिवेशन लक्षात घेऊन परीक्षा सकाळी 10.30 ऐवजी सकाळी 11.30 वाजता सुरू होईल, असे मंडळाने म्हटले आहे. त्याचवेळी सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या वाचनाची वेळ 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटे असेल. प्रात्यक्षिक परीक्षा टर्म परीक्षा संपण्यापूर्वी घेण्यात येतील. याशिवाय दहावी, बारावीचा निकाल दुसऱ्या सत्राच्या परीक्षेनंतर जाहीर केला जाईल.

यंदा सीबीएसई बोर्डाने शैक्षणिक सत्राचे दोन भाग केले आहेत. त्याचवेळी, प्रत्येक सत्रात सुमारे 50 टक्‍के अभ्यासक्रम विचारला जाईल. खरे तर, कोव्हिड- 19 च्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. अशा परिस्थितीत या वेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेता, बोर्डाने जुलैमध्ये सांगितले होते की, बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याची शक्‍यता वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाचे दोन भागांमध्ये विभाजन करून परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT