CBSE Term 2 Exam 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE Term 2 Exam : 10 वी, 12 वी टर्म-2 परीक्षा 4 मे रोजी होणार?

सकाळ डिजिटल टीम

बोर्डाकडून निकालाच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही; पण..

CBSE Term 2 Exam 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड Central Board of Secondary Education (CBSE) टर्म-1 परीक्षेच्या (CBSE Term 1 Result) निकालाची वाट पाहत आहे. या आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावरुन (Social Media) येत आहेत. मात्र, आता CBSE टर्म-2 परीक्षेबाबत एक नोटीस व्हायरल झालीय. यात 4 मे 2022 पासून 10 वी-12 वीची परीक्षा सुरू होणार असल्याचं सांगण्यात येतंय. यासोबतच या व्हायरल नोटिसीत असंही म्हंटलंय की, सीबीएसईनं बोर्डाशी (CBSE Board) संलग्न असलेल्या शाळांना इयत्ता 10 वी आणि 12 वीचे प्रात्यक्षिक, प्रकल्प आणि अंतर्गत मूल्यमापन करण्याची परवानगी दिलीय. मात्र, सीबीएसईनं ही नोटीस पूर्णपणे फेटाळलीय. सीबीएसईनं ती पूर्णपणे बनावट असल्याचं म्हंटलंय.

सीबीएसईनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर (CBSE Twitter) ही नोटीस बनावट असल्याचं सांगितलंय. अशा खोट्या नोटिसांपासून सावध रहा. कारण, अशी कोणतीही घोषणा सीबीएसईनं केलेली नाही. यापूर्वीही बोर्डाच्या परीक्षांबाबत अनेक बनावट नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांनी कोणत्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नये, असा सल्ला बोर्डानं दिलाय. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थ्यांनी माहिती तपासावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.

CBSE टर्म-1 चा निकाल कधी जाहीर होणार?

बोर्डाकडून निकालाच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, लवकरच CBSE टर्म 1 चा निकाल जाहीर होणार आहे. CBSE बोर्ड आपल्या वेबसाइटवर cbseresults.nic.in 2022 इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करेल. याशिवाय एसएमएस आणि डिजिलॉकरद्वारेही निकाल पाहता येणार आहे. सीबीएसई 10 वी आणि 12 वी वर्ग टर्म 1 परीक्षा डिसेंबर महिन्यात पूर्ण झाली. तेव्हापासून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, CBSE इयत्ता 10 वी, 12 वी टर्म 2 च्या परीक्षा मार्च-एप्रिल 2022 मध्ये नियोजित आहेत. बोर्डानं त्याचे नमुना पेपर जारी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT