Air Force  Air Force
एज्युकेशन जॉब्स

CASB : लवकरच जाहीर होऊ शकतो एअरफोर्स परीक्षेचा निकाल

एअर फोर्स ग्रुप X आणि Y परीक्षा २०२१ मध्ये सहभागी झालेले उमेदवार त्यांच्या निकालाची दीर्घकाळ वाट पाहत आहेत

सकाळ डिजिटल टीम

सेंट्रल एअरमेन सिलेक्शन बोर्ड (CASB) लवकरच इंडियन एअर फोर्स ग्रुप X आणि Y चा निकाल २०२१ जाहीर (IAF Group X and Y Result 2021) करणार आहे. वायुसेना गट X आणि Y भरती २०२१ परीक्षा १२ ते १८ जुलै २०२१ या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. एअर फोर्स ग्रुप X आणि Y परीक्षेचे निकाल CASB च्या वेबसाइट airmenselection.cdac.in वर प्रसिद्ध केले जाऊ शकतात. त्यामुळे उमेदवार वेळोवेळी या वेबसाइटला भेट देत राहावे.

एअर फोर्स ग्रुप X आणि Y परीक्षा २०२१ मध्ये सहभागी झालेले उमेदवार त्यांच्या निकालाची दीर्घकाळ वाट पाहत आहेत. यावेळी निकालाला बराच विलंब होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. आता फोर्स ग्रुप एक्स आणि वाय परीक्षेचे २०२२ चे फॉर्म देखील जानेवारीमध्ये निघणार आहेत. त्यामुळे २०२१ आणि २०२२ चे निकाल एकाच वेळी जाहीर होतील असे दिसते. परंतु, CASB लवकरच एअरमन भर्ती परीक्षा २०२१ चा निकाल प्रसिद्ध करेल अशी अपेक्षा आहे.

हवाई दलातील एअरमन निवडीसाठी ग्रुप X आणि ग्रुप Y परीक्षा १८ ते २४ एप्रिल २०२१ मध्ये होणार होती. परंतु, कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली आणि पुन्हा जुलै २०२१ मध्ये घेण्यात आली.

IAF गट X आणि Y परीक्षा 2022 तारीख

अहवालानुसार, एअर फोर्स ग्रुप X आणि Y परीक्षा २०२२ साठी ऑनलाइन अर्ज जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत चालतील. तर परीक्षा एप्रिल २०२२ मध्ये घेतली जाईल. मात्र, उमेदवारांना यासंदर्भात अधिकृत अधिसूचनेची प्रतीक्षा करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

जेवताना उचकी लागली, नंतर नाकातून रक्त आलं अन्...; कॉलेजमध्येच विद्यार्थिनीसोबत अघटीत घडलं

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

Latest Maharashtra News Updates : पाचोऱ्यात अवैधरित्या गॅस भरणाऱ्यावर पोलीस निरीक्षक राहुल पवार यांची कारवाई

Narendra Modi: मोदींच्या सभेत महिलांचं 'खुर्ची युद्ध'! एकमेकींच्या डोक्यात घातल्या चेअर, Video Viral

SCROLL FOR NEXT