Central Railway Recruitment  
एज्युकेशन जॉब्स

10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी

सकाळ डिजिटल टीम

Central Railway Recruitment 2022 : मध्य रेल्वेने (Central Railway) अप्रेंटिस (central railway apprentice 2022)च्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 17 जानेवारी 2020 पासून सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com द्वारे 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

शिकाऊ उमेदवारांच्या (अप्रेंटिस ) एकूण 2422 रिक्त पदांवर भरतीसाठी ( Central Railway Recruitment 2022) अर्ज मागवण्यात आले आहेत. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे मुंबई विभागात 1659 पदे, भुसावळ विभागात 418 पदे, पुणे विभागात 152, नागपूरमध्ये 114 आणि सोलापूरमध्ये 79 पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असले पाहिजेत. याव्यतिरिक्त, उमेदवाराकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

वयोमर्यादा किती आहे

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल

उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर तयार केलेल्या मेरिटच्या आधारावर केली जाईल.

या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा

अर्ज सुरू होण्याची तारीख - 17 जानेवारी 2022,

अर्जाची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2022

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT