CET Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

CET Exam : सीईटीची नोंदणी होणार अ‍ॅपवरून

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा यंदा नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा यंदा नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे.

मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा यंदा नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे. पहिल्यांदाच उमेदवारांना सीईटी परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया करण्यासाठी अ‍ॅपच्या माध्यमातूनही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आज सीईटी सेल आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी मुंबईत दिली. यावेळी प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. पी.डांगे आदी अधिकारी उपस्थित होते.

राज्यात उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी, कला संचालनालय आदी शिक्षणाच्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयाच्या 18 अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा सीईटी सेल मार्फत घेतल्या जाणार आहेत. या सर्व परीक्षा त्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक आणि एकूण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमानुसार जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व परीक्षा आणि त्यांचे निकाल आदी जाहीर केले जाणार असल्याने ऑगस्ट महिन्यात राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि त्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होईल. त्यासाठी सीईटी सेलने नियोजन केले असल्याची माहिती देण्यात आली.

सीईटी च्या एकूण 18 परीक्षा पैकी चार अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलने https://mahacet.org या आपल्या संकेस्थळावर उपलब्ध करून दिले असून त्यातील माहितीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन आयुक्त वारभुवन यांनी केले.

यावेळी परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये २४० परीक्षा केंद्र असतील. तर सीईटीच्या विविध परीक्षा इतर १० राज्यातील केंद्रांवर ही घेतल्या जाणार असून यामध्ये एमबीए, एमसीए आदी परीक्षांच्या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती! पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; ६९ जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT