लोकसेवा आयोगानं राज्य सेवा परीक्षेची अधिसूचना नुकतीच जारी केलीय.
CGPSC PCS 2021 : छत्तीसगड लोकसेवा आयोगानं राज्य सेवा परीक्षेची (Chhattisgarh CGPSC PCS Notification 2021) अधिसूचना नुकतीच जारी केलीय. या भरती परीक्षेद्वारे राज्यातील विविध विभागांतील 171 महत्त्वाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये डीएसपीची 30 पदे, उपजिल्हाधिकाऱ्यांची 15, वित्त अधिकारी 10, सहाय्यक संचालक भूमी अभिलेख 10 आणि नायब तहसीलदारच्या 30 पदांची भरती होणार आहे. दरम्यान, psc.cg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर 1 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2021 असणार आहे.
यामध्ये 171 पदांपैकी 54 पदे एसटीसाठी, 23 पदे अनुसूचित जाती, तर 25 पदे ओबीसीसाठी राखीव असणार आहेत. शिवाय, 69 पदे अनारक्षित आहेत. दरम्यान, 31 डिसेंबर ते 4 जानेवारी 2022 पर्यंत अर्जातील त्रुटी दुरुस्त करता येणार आहे, तर 5 ते 9 जानेवारी या कालावधीत 100 रुपये शुल्कासह अर्जातील दुरुस्ती करता येतील.
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा : डीएसपीसाठी 21 ते 28 वर्षे व इतर पदांसाठी 21 ते 30 वर्षे वयोमर्यादा असणार आहे, तर राज्यातील उमेदवारांची वयोमर्यादा 21 वरून 35 वर्षे निश्चित करण्यात आलीय. छत्तीसगड राज्यातील आरक्षण उमेदवार 45 वर्षे वयापर्यंत अर्ज करू शकतात.
निवड : लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. प्रीलिम्स परीक्षा 13 फेब्रुवारी 2022 रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. 26 ते 29 मे 2022 दरम्यान मुख्य परीक्षा होणार आहे.
अर्ज फी : छत्तीसगडमधील रहिवाशांसाठी 300 रुपये, तर इतर राज्यांतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 400 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.