CA Result 2021  sakal media
एज्युकेशन जॉब्स

सीएचा निकाल जाहीर; नंदिनी अग्रवाल देशात पहिली

संजीव भागवत

मुंबई : जुलै महिन्यात देशभरात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (Chartered Accountancy) घेण्यात आलेल्या सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल (Final exam result) आज जाहीर केला आहे. यामध्ये मोरेना येथील नंदिनी अग्रवाल (Nandini Agrawal) देशात पहिली आली आहे. तर इंदूरची साक्षी अरियन दुसरी आणि बंगरुळूची साक्षी बगरेचा ही तिसरी आली आहे.

जुन्या व नव्या सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा ५ जुलै ते १९ जुलै दरम्यान घेण्यात आली होती. जुन्या अभ्यासक्रमात मंगळुरू येथील रूथ डिसिल्व्हा प्रथम तर पालाकाड येथील मालविका कृष्णन दुसरी आली आहे. जुन्या अभ्यासक्रमासाठी ४६ हजार १३९ विद्यार्थ्यांनी तर नवीन अभ्यासक्रमासाठी ८२ हजार ८३९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नवीन अभ्यासक्रमाला दोन्ही ग्रुप घेऊन परीक्षा दिलेल्या २३ हजार ९८१ विद्यार्थ्यांपैकी अवघे ११.९७ टक्के म्हणजे दोन हजार ८७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय ९ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी पहिला ग्रुप तर ७ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी दुसरा ग्रुप उत्तीर्ण केला आहे. याचबरोबर सोमवारी फाउंडेशन अभ्यासक्रमाचाही निकाल जाहीर झाला आहे. या अभ्यासक्रमाची परीक्षा ७१ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी २६.६२ म्हणजे १९ हजार १५८ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT