China
China esakal
एज्युकेशन जॉब्स

मुलांच्या गुन्ह्याची शिक्षा आता पालकांना लागणार भोगावी

सकाळ डिजिटल टीम

चीनमध्ये (China) आता मुलांच्या चुकीची शिक्षा पालकांना भोगावी लागणार आहे.

चीन : चीनमध्ये (China) आता मुलांच्या चुकीची शिक्षा पालकांना भोगावी लागणार आहे. यासाठी चीनच्या संसदेत (China’s Parliament) एक कायदा केला जात आहे. याअंतर्गत, पालकांना मुलाने केलेल्या चुकीच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे. 'फॅमिली एज्युकेशन प्रमोशन लॉ'च्या (Family education promotion law) मसुद्याअंतर्गत, पालकांच्या देखरेखीखाली मुलं खूप वाईट किंवा गुन्हेगारी वर्तन दाखवतात, असं आढळल्यास पालकांना सक्त ताकीद केली जाईल, असं कायद्यात नमूद केलंय.

किशोरवयीन मुलांच्या गैरवर्तनाची अनेक कारणं आहेत आणि मुख्य कारण म्हणजे, कौटुंबिक शिक्षणाचा अभाव किंवा अयोग्य कौटुंबिक शिक्षण. नॅशनल पीपल्स काँग्रेसचे (एनपीसी) प्रवक्ते जांग तिवेईक म्हणाले, या कायद्याबाबत विचार सुरु असून हा कायदा लवकरच अंमलात आणला जाईल. NPC च्या स्थायी समितीनं याबाबत पालकांशीही चर्चा केलीय. तसेच एनपीसीनं पालकांना विनंती केलीय, की त्यांच्या मुलांना विश्रांती, खेळ आणि व्यायाम करण्यासाठी वेळ द्यावा. यावर्षी बीजिंगनं (Beijing) मुलांशी संबंधित समस्यांवर अधिक प्रकारे कारवाई केलीय.

या नवीन कायद्यात काय आहे?

नवीन कायद्याच्या मसुद्याअंतर्गत, जर मुलांनी कायदेशीर वयापेक्षा कमी वयाचा गुन्हा केला असेल, तर त्यांच्या पालकांना अधिकाऱ्यांकडून शिक्षा होईल. चीनमधील बहुतेक गुन्ह्यांसाठी कायदेशीर वय 16 आहे. जर कुटुंबानं नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांना ताकीद केली जाईल. तसेच पालकांना 1000 युआन (सुमारे 11 हजार रुपये) दंड ठोठावला जाईल अथवा त्यांना पाच दिवस कोठडीत ठेवलं जाईल. चीनचं म्हणणं आहे, की या कायद्याचा उद्देश संपूर्ण देशात पालकत्व कौशल्ये, नीतीमत्ता आणि समाजवादाच्या मूळ मूल्यांना प्रोत्साहन देणं आहे.

चीननं 'ऑनलाइन'ची वेळ केली निश्चित

तरुणांमध्ये ऑनलाइन गेमची वाढती क्रेझ रोखण्यासाठी चीननं कारवाई करण्यास सुरुवात केलीय. याशिवाय, इंटरनेट सेलिब्रिटींचे फॉलोअर्सही नियंत्रणात ठेवण्यात आले आहेत. अलिकडच्या काही महिन्यांत शिक्षण मंत्रालयानं अल्पवयीन मुलांसाठी इंटरनेट गेमिंग वेळ कमी केलीय. नवीन नियमांनुसार मुलांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी फक्त एक तास गेम खेळण्याची परवानगी देण्यात आलीय. चीनमध्ये गृहपाठ कमी करण्यात आले असून मुख्य विषयांच्या शिकवण्यांना शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी बंदी घालण्यात आलीय. विद्यार्थ्यांवर कोणताही भार पडू नये म्हणून हे करण्यात आले आहे, असं नमूद करण्यात आलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT