crime news murder of college student due to fight between senior and junior nagpur  esakal
एज्युकेशन जॉब्स

सिनिअर,ज्यूनिअरच्या भांडणातून विद्यार्थ्याचा निर्घृण खून

एक जखमी ः पोलिसांकडून आरोपीसह सहा जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाविद्यालयात सिनिअर,ज्युनिअरच्या भांडणात विद्यार्थी असलेल्या युवकांच्या गटाने एका विद्यार्थ्याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची खळबळजनक घटना सेमिनरी हिल्स येथील बालोद्यान परिसरात दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दीपांशू पंडित (वय २० रा. अजनी) असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव असून तो रायसोनी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. हर्ष गोवर्धन डांगे (वय २२ रा. साईनगर, वाडी) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.

तो वाडी परिसरात असलेल्या मॉडर्न कॉलेजमध्ये शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपांशू याचे महाविद्यालयातील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी भांडण झाले. ही बाब माजी विद्यार्थी असलेल्या अंकित कासार (रा.एमआयडीसी) याला कळली. त्यामुळे दीपांशूला दम देण्यासाठी आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास अंकित कासार आणि हर्ष त्यांच्या काही मित्रांसह रायसोनी महाविद्यालयात गेले होते.

यावेळी अंकित याने दीपांशूला सिनियरला मारशील का? असे म्हणत दोन चार झापड मारल्या. यावेळी दोघांचेही भांडण झाले. ते भांडण मिटल्यानंतर अंकित आणि हर्ष त्यांच्या मित्रासोबत निघून गेले. दरम्यान सेमिनरी हिल्स येथील चहाच्या टपरीजवळ ते बसून आपसात चर्चा करीत होते. दरम्यान हर्ष आणि त्याचा मित्र अंकित कासार (रा.एमआयडीसी) आणि इतर काही मित्र होते. यावेळी दीपांशू आणि त्याच्या साथीदारांनी हर्ष आणि त्याचा साथीदारांना घेरले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचे काही मित्र पळून गेले. काही वेळातच दीपांशू आणि त्याच्या मित्रांनी धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. हर्षच्या पोटात तर अनिकेतला मांडीला दुखापत झाली. हर्ष आणि अनिकेत यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवून हल्लेखोरांनी पळ काढला.

प्रकरणाची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हर्षचा जागेवरच मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविला. यावेळी अंकीतला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे फिरवत दीपांशूसह आठ जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

आमच्या मित्राला वाचवा

सेमिनरी हिल्स परिसरात एकीकडे दीपांशू आणि त्याचे साथीदार हर्षला बेदम मारहाण करीत असताना काही मित्रांनी परिसरातील गुन्हे शाखेचे कार्यालयात धावत जाऊन त्यांना प्रकरणाची माहिती दिली. यावेळी आमच्या मित्राला वाचवा अशी ओरड त्यांनी केली. त्यातून पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस पोहचपर्यंत हर्ष रक्ताच्या थारोळ्यात होता आणि त्याच्या मृत्यू झाला होता.

आरोपीने मित्रांना घेतले बोलावून

दीपांशू हा राग डोक्यात ठेऊन त्याने आपल्या काही मित्रांना एकत्र केले. यावेळी त्याला अंकित सेमिनरी हिल्स परिसरात आपल्या मित्रासह असल्याची माहिती मिळाली. तिथे दीपांशू याचे एसएफएस महाविद्यालयातील काही मित्र होते. त्यांना संपर्क साधून त्याने त्यांना बोलावून घेतले. याशिवाय आपल्या परिसरातील मित्र असे सात ते आठ जणांना बोलाविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

Latest Marathi News Update: एसडीपीआय आणि रहिवाशांनी येलहंका येथील अतिक्रमण हटाव मोहिमेचा निषेध

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच उमेदवार ३ पक्षांकडून करत आहे अर्ज!

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

SCROLL FOR NEXT