daily routine of humans atomic habits Sakal
एज्युकेशन जॉब्स

सवयींचे सामर्थ्य

‘माणूस हे त्याने स्वतःला लावलेल्या सवयींतून तयार झालेले उत्पादन आहे’ असे म्हटले आहे. सवयी आपल्या कृती, निर्णय आणि पर्यायाने आपले नशीब घडवतात.

सकाळ वृत्तसेवा

- प्रांजल गुंदेशा

‘माणूस हे त्याने स्वतःला लावलेल्या सवयींतून तयार झालेले उत्पादन आहे’ असे म्हटले आहे. सवयी आपल्या कृती, निर्णय आणि पर्यायाने आपले नशीब घडवतात. लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावाव्यात. कारण मुले अक्षरशः स्पंजप्रमाणे त्यांना दिसेल ते टिपतात. त्यामुळे चांगल्या सवयी लागल्यास त्यांची जडण-घडण उत्तम होते.

लेखक जेम्स क्लियर यांनी त्यांच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या ‘ॲटॉमिक हॅबिट्स’ या पुस्तकामध्ये सवयी लागण्यासाठी काही सोप्या धोरणांची रूपरेषा दिली आहे. ती लागू करून, मुले आणि प्रौढ व्यक्तीदेखील अशा काही सवयी विकसित करू शकतात, की ज्यामुळे ते यशस्वी होऊ शकतात. कोणतीही सवय लागताना चार वर्तणूक अवस्था येतात. त्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे.

  • क्यू (सूचना) : सवय सुरू करणारा ‘ट्रिगर’.

  • इच्छा : सवय लागण्याची इच्छा किंवा प्रेरणा.

  • प्रतिसाद : सवय पूर्ण करण्यासाठी केलेली कृती.

  • लाभ : सवय पूर्णतः लागल्याने होणारा फायदा.

आता या तक्त्याचा वापर आपण वास्तवात कसा करू शकतो? ते पाहूया -

सतत ‘स्क्रीन’ची सवय मोडणे :

दुर्लक्ष करा : मोबाईल दूर ठेवा, टीव्ही कनेक्शन काढून ठेवा.

आकर्षण कमी करा : मनोरंजनाचा दुसरा पर्याय तयार करा. जसे की, मित्रांसोबत वेळ घालविणे वगैरे.

अवघड करा : सेटिंग्ज बदला, फायरवॉल जोडा, ॲप्सला डिजिटल लॉक लावा.

असमाधानकारक करा : स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी वेगळा ‘प्लॅन’ तयार करा आणि त्याची अंमलबजावणी न झाल्यास तो रद्द करा. मित्रांनी मिळून एकत्रितपणे ‘स्क्रीन टाइम’ कमी करण्याचे आव्हान स्वीकारा.

व्यायाम करण्याची सवय लावणे :

सहज स्वीकार : अलार्म सेट करा, व्यायामाचे व्हिज्युअल रिमांइंडर म्हणून वर्कआउटचे कपडे दरवाजाजवळ ठेवा.

आकर्षण : व्यायाम अधिक आनंददायी करण्यासाठी मित्रांसह एखाद्या फिटनेस क्लबमध्ये सहभागी व्हा.

सोपे करा : घराजवळची व्यायामशाळा निवडा किंवा घरी व्यायाम करा. सुरुवातीला सोपे व्यायाम प्रकार करा.

समाधानकारक करा : व्यायामानंतरचे पौष्टिक जेवण किंवा आरामशीर अंघोळ किंवा वर्कआउट सेल्फी अशा आनंददायी गोष्टींनी व्यायामाची सवय लावून घ्या.

मुलांना चांगल्या सवयी लावताना

स्पष्ट करा

व्हिज्युअल संकेत : खेळण्यास किंवा वाचनास प्रोत्साहित करण्यासाठी मुलांच्या अवतीभवती खेळणी, पुस्तके ठेवा. रंगीत तक्ते किंवा स्टिकर्सही वापरा.

दिनचर्या : गृहपाठ, काम आणि झोपण्याची वेळ यांसारख्या गोष्टींसाठी दैनंदिन वेळापत्रक तयार करा.

आकर्षक करा

गेमिंग पद्धत : कोणतेही काम किंवा क्रिया शिकताना त्यासाठी विविध ‘गेम्स’ वापरून बघा.

विविध पर्याय : मुलांच्या समोर त्यांच्यासाठी योग्य असलेले विविध पर्याय ठेवा आणि त्यातून त्यांना निवड करू द्या.

सोपे करा

विभागणी करा : कोणतेही काम छोट्या छोट्या भागांमध्ये विभागून घ्या. त्यामुळे प्रक्रिया सोपी होते.

साधनांची उपलब्धता : मुलांना पुस्तके, उपकरणे द्या. प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळवून द्या.

समूह : चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी संबंधित समूहांमध्ये सहभागी व्हा.

समाधानकारक करा

छोटे बक्षीस : छोट्या छोट्या टप्प्यांवर मुलांना बक्षिसे द्या. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढतो. छोटे खेळणे, आवडते खाद्यपदार्थ, छोटी सहल अशी बक्षिसे वेळोवेळी द्या.

आत्मचिंतन : मुलांना त्यांची प्रगती आणि त्यांच्या सवयींबाबत विचार करण्यास प्रोत्साहित करा.

सरतेशेवटी हे सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे की, कोणत्याही गोष्टीत सातत्य असेल तर तिची सवय लागते. त्यामुळे लहान लहान गोष्टींनी सुरुवात करा. त्यांचे रूपांतर चांगल्या सवयींमध्ये झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी pranjal_gundesha या इन्स्टाग्राम पेजला आणि द इंटेलिजन्स प्लस या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या.

कोणतीही सवय लागताना त्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर असे वातावरण तयार करता येते की, ज्यामुळे केवळ चांगल्या सवयी लागतील आणि त्या टिकवूनही ठेवता येतील. खालील तक्त्याचा विचार करूया -

नियम -चांगली सवय लावणे -वाईट सवय मोडणे- संबंधित कृती

पहिला- सहज स्वीकारा- दुर्लक्ष करा - क्यू (सूचना)

दुसरा -आकर्षकता निर्माण करा- आकर्षण कमी करा -इच्छा

तिसरा- सोपे करा -अवघड करा -प्रतिसाद

चौथा -समाधानकारकता- असमाधानी अवस्था -लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT