Beauty and Wellness Career Opportunity Sakal
एज्युकेशन जॉब्स

विशेष : ब्युटी आणि वेलनेसमधील करिअरसंधी

सौंदर्यशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या मेकअप, स्पा अशा विविध क्षेत्रांशी निगडित करिअर संधी सध्या उपलब्ध आहेत.

अक्षय साबळे

सौंदर्यशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या मेकअप, स्पा अशा विविध क्षेत्रांशी निगडित करिअर संधी सध्या उपलब्ध आहेत. ‘फीलिंग फिट’ आणि ‘लुकिंग गुड’ची गरज समाजाच्या सर्व स्तरांतील वेगवेगळ्या वयोगटांना जाणवत आहे. व्यक्तिमत्त्व रुबाबदार होण्याकडे प्रत्येकाचा कल आहे. सौंदर्यशास्त्राच्या महत्त्वाच्या शाखा म्हणजे फॅशन, ब्युटीकेअर, हेअरड्रेसिंग, स्पा आणि वेलनेस उद्योग. एखाद्या घरगुती ब्युटी पार्लरपासून अद्ययावत ब्युटी सलून किंवा एखाद्या मध्यम दर्जाच्या लोकवस्तीतील वेलनेस क्लिनिकपासून भर समुद्रातील प्रवासी जहाजावरील स्पा वेलनेस सेंटरपर्यंत या उद्योगाचा आवाका पसरलेला आहे. या सेवा देणाऱ्या व्यक्तींनी ‘ब्युटी थेरपी’ विषयक प्रशिक्षण प्राप्त केलेले असते. उत्तम मोबदला मिळू शकणाऱ्या या क्षेत्रात अलीकडच्या काही वर्षांत मोठे बदल घडत आहे.

या क्षेत्रातील सेवांचा लाभ महिलांप्रमाणे अलीकडे पुरुषवर्गही मोठ्या प्रमाणावर घेताना दिसून येतो. यात क्लिन्सिंग, मसाजिंग, फेशियल तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार मेकओव्हरसाठी योग्य सल्ला आणि त्यानुसार केशरचनेतील बदल, वॅक्सिंग, इलेक्ट्रोथेरपी व अन्य शस्त्रक्रियांव्यतिरिक्त सौंदर्य सेवांचा समावेश आहे.

आवश्‍यक शिक्षण

या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी रीतसर प्रशिक्षण प्राप्त करणे गरजेचे आहे. यामध्ये एक वर्षाचा डिप्लोमा आणि स्पेशलायझेशन बेसिक व ॲडव्हान्स हेअर, ब्युटी, मेकअप यांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दर्जेदार संस्थांमधून अभ्यासक्रम केल्यास थिअरी आणि प्रॅक्टिकल्सचा सराव चांगला होतो. त्याचा उपयोग स्वत:चे करिअर उभे करण्यासाठी होऊ शकतो.

करिअर संधी

चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका, देशी- विदेशी चित्रपट, स्पा आणि वेलनेस सेंटर्स, हेल्थ रिसॉर्टमधील ब्युटी क्लिनिक्स, सलून्स, कॉस्मेटिक कंपनी, दूरचित्रवाणीवरील जाहिराती, मॉडेलिंग एजन्सीज व प्रत्यक्ष घरपोच सौंदर्य सेवा या क्षेत्रांत ब्युटीशियन, मेकअपमन, हेअर ड्रेसर यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तसेच, स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो. तंत्रज्ञानातील प्रगती आणि ग्राहकांच्या वाढत्या गरजा यांमुळे दिवसेंदिवस या क्षेत्राला असणारी मागणी वाढत असून, त्याच प्रमाणात नोकऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे करिअर करण्यासाठी या क्षेत्राचा विचार तुम्हाला नक्की करता येईल.

आहाराचेही महत्त्व

सौंदर्य आणि आहार यांचा खूप निकटचा संबंध आहे, मात्र ही माहिती नसल्याने आहाराकडे दुर्लक्ष करून केवळ विविध सौंदर्यवृद्धीसाठी उपाय करण्याकडे कल दिसतो. नियमित योगासने केल्याने त्वचा सतेज व मनही प्रसन्न राहते. मनात भीती असल्यास ती आपल्या चेहऱ्या‍वर स्पष्ट जाणवते.

निरोगी त्वचा, निरोगी केस आणि सुंदर दिसण्यासाठी काही मर्यादेपर्यंत मेकअप कामी येतो, पण केवळ मेकअपमुळे हे सर्व शक्य होत नाही. थोडक्यात, सुंदर त्वचेसाठी नियमित योगा आणि आहारदेखील संतुलित आणि पौष्टिक असणे गरजेचे आहे. नैसर्गिकरित्या आपण वेलनेस टिकवल्यास सौंदर्य आपसूकच निर्माण होते.

- प्राचार्य डॉ. अजयकुमार राय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return : वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Mumbai Rain: मुंबईत जोरदार पाऊस! अनेक भागात पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक बिघडले अन्...; जाणून घ्या स्थिती

Crime News: धावत्या बसमध्ये प्रसूती; नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची अमानुष घटना

Mumbai News: मुंबईतील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

SCROLL FOR NEXT