Hotel Management Sakal
एज्युकेशन जॉब्स

विशेष : करिअरचा उत्तम पर्याय हॉटेल मॅनेजमेंट

अलीकडे तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबर मानवी राहणीमानाचा दर्जाही सुधारला आहे. दळणवळणाची असंख्य साधने निर्माण झाल्याने या प्रदेशातून त्या प्रदेशात भ्रमंती करणे आता सहज शक्य आणि सोपे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अलीकडे तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबर मानवी राहणीमानाचा दर्जाही सुधारला आहे. दळणवळणाची असंख्य साधने निर्माण झाल्याने या प्रदेशातून त्या प्रदेशात भ्रमंती करणे आता सहज शक्य आणि सोपे झाले आहे. आपल्या देशातील पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्र निरंतर वाढत आहे. भारत हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्याने हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र पहिल्यापेक्षा अधिक विस्तारले आहे. अर्थात गेल्या काही वर्षात देशाला पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायालाही चांगले दिवस आले आहेत. पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय याचा अनन्यसाधारण संबंध आहे.

करिअर संधी

फाइव्ह स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट, एअरलाईन्स फूड सर्व्हिस देणाऱ्या संस्था, हॉस्पिटल, कॉर्पोरेट कँटीन, मॉल्स, रेल्वे आतिथ्य व खानपान सेवा, प्रवासी जहाजांवरील खानपान सेवा, पर्यटन विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फास्टफूड साखळी अशा अनेक क्षेत्रातही नोकरी मिळू शकते. फ्रंट ऑफिस, हाऊस कीपिंग, फूड अँड बिव्हरेजेस विभाग, अकौंटिंग विभाग, सिक्युरिटी विभाग, बँक्वेट विभाग, बिझनेस सेंटर, मार्केटिंग विभाग, इंजिनिअरिंग किंवा मेंटेनन्स विभाग असे अनेक विभाग असतात, आपल्या कल आणि आवडी निवडीनुसार कामाची निवड करता येते. तसेच पुरेशा अनुभवानंतर स्वत:चा व्यवसाय सुरु करता येईल.

सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात हॉटेल व्यवसायाचा अग्रक्रम लागतो. केंद्र आणि राज्य सरकारे या दोन्ही उद्योगांना अनेक सवलती देतात. हा व्यवसाय वाढत चालल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची गरजसुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. या व्यवसायाचा आत्मा ‘सोफिस्टेकेशन’ असल्याने हे तंत्र आत्मसात करणे आवश्यक ठरते. हॉटेल व्यवसायाच्या आर्थिक समृद्धीशी हे तज्ज्ञ थेट संबंधित असल्याने त्यांना मोठी मार्केट व्हॅल्यू निर्माण झाली आहे. हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था देशात आहेत.

हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आज मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित लोकांची गरज निर्माण झाली आहे. या क्षेत्राविषयी जागरूकता आणि त्यामध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून विद्यार्थी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रगती करू शकतात, या बद्दल शंकाच नाही.

- प्राचार्य डॉ. अजयकुमार राय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS Test: W,W,W... शून्यावर ३ विकेट्स अन् २७ वर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियासमोर विंडीजची शरणागती, भारताचा लाजीरवाणा विक्रमही मोडला

आनंदाची बातमी! 'गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार': मंत्री प्रताप सरनाईक; वाहनदुरुस्ती पथक तैनात करणार

Latest Marathi News Live Updates : 'मी ब्राह्मण आहे; इथे ब्राह्मणांचं जास्त चालत नसलं तरी, उत्तर प्रदेशमध्ये चालतं' - नितीन गडकरी

Ganesh Festival Travel: बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

Shivsena : 'राजू शेट्टींची प्रकरणे माझ्याकडे, सतेज पाटील बगलबच्च्यांना पुढे करतात'; 'शक्तिपीठ'वरून क्षीरसागरांच्या शिलेदाराची टीका

SCROLL FOR NEXT