Engineering Admission
Engineering Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

टेक करिअर : अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

एनआयटी, आयआयटी, ट्रिपल आयटी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानित संस्थांमधील अभियांत्रिकी प्रवेशाचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे. या संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी आपण जाणून घेऊयात.

- डॉ. दिनेश भुतडा

एनआयटी, आयआयटी, ट्रिपल आयटी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानित संस्थांमधील अभियांत्रिकी प्रवेशाचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे. या संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी आपण जाणून घेऊयात.

आयआयटी

आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. देशभरातील प्रथम क्रमांकाच्या प्रतिष्ठित अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या २३ संस्थांमधून होणाऱ्या सुमारे १६,२३४ जागांवरील प्रवेशासाठी जेईई-मेन२०२२ ही पात्रता परीक्षा देणे आवश्यक आहे. दरवर्षी जेईई मेन मधून अडीच लाख विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स परीक्षेसाठी संधी देण्यात येते. आयआयटी प्रवेश जेईई ॲडव्हान्स२०२२ च्या माध्यमातून होतात. यावर्षी ही परीक्षा २८ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर झालेली आहे.

एनआयटी

‘एनआयटी’चे प्रवेश देशभरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या बत्तीस संस्थांमधून सुमारे २४,००० उपलब्ध होणाऱ्या जागांवरील प्रवेश जेईई-मेन्स २०२२मधून प्राप्त होणाऱ्या मेरीट क्रमांकानुसार होतात.

आयआयआयटी

देशभरातील २६ आयआयआयटी (ट्रिपल आयटी) संस्थांमधील सुमारे ४०५३ जागांवरील प्रवेश जेईई-मेन २०२२ मधून प्राप्त होणाऱ्या रँकनुसार होतात. यातील ट्रिपल आयटी पुणे व नागपूर महाराष्ट्रात आहेत.

गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट

देशभरातील निवडक सेंट्रल व स्टेट गव्हर्नमेंट संस्थांमधील प्रवेश मेन २०२२ मधूनच होतील.

आयआयएसटी

भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी या संस्थेमधील चार वर्ष कालावधीच्या बीटेक अभ्यासक्रमात सुमारे १६० जागांवरील प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा नसते. जेईई मेन्स नंतरच्या जेईई ॲडव्हान्स २०२२ मधील रँक नुसार प्रवेश दिले जातात.

आयसर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चच्या देशभरात सात ठिकाणी आहेत. या संस्थांच्या प्रवेशासाठी उपलब्ध १,८०० जागांपैकी २५ टक्के जागेवरील प्रवेश जेईई ॲडव्हान्समधून होतात.

खालील संस्थांमध्ये जेईईमधील मेरिट क्रमांकानुसार अर्ज मागवून प्रवेश होतात.

  • इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईमधील बी टेकच्या सात शाखा मधील तीस टक्के जागेवरील प्रवेश.

  • आयसीटी मुंबई-भुवनेश्वर कॅम्पसमधील इंटिग्रेटेड एमटेक केमिकल इंजिनिअरिंगच्या प्रवेश.

  • आयसीटी मुंबई मराठवाडा जालना कॅम्पसमधील इंटिग्रेटेड एमटेक केमिकल इंजिनिअरिंगच्या साठ जागांपैकी तीस टक्के जागा व उर्वरित ७० टक्के जागा राज्याच्या एमएचटी-सीईटी मधून. महाराष्ट्रातील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील १५ टक्के जागा.

  • धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गांधीनगर मधील बीटेक (आयसीटी) पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश.

  • पुणे येथील नामांकित स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या प्रवेशासाठी जेईई-मेन २०२२ चा स्कोअर इतर प्रवेश प्रक्रिया सोबतच ग्राह्य धरण्यात येतो.

  • पंडित दीनदयाल पेट्रोलियम युनिव्हर्सिटी, गांधीनगर मधील चार वर्ष बीटेकचे प्रवेश.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT