Dr Sumita Joshi writes about the banking and insurance sector sakal
एज्युकेशन जॉब्स

बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रातील भरारी

या व्यावसायिक अभ्यासक्रमात वित्त व विमा क्षेत्राशी निगडित अशा मूलभूत व प्रगत विषयांचे ज्ञान व त्याचे व्यावहारिक जीवनातील उपयोगिता याचे प्रशिक्षण दिले जाते.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. डॉ. सुमिता जोशी

बीबीए : बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये काही निवडक विद्यापीठांनी तसेच महाविद्यालयांनी आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन विशेष शाखांचा अंतर्भाव केला आहे. ‘बीबीए - इंटरप्रिन्युअरशिप अँड फॅमिली बिझनेस’, ‘बीबीए - बिझनेस अनॅलिटिक्स’, ‘बीबीए - रिटेल मॅनेजमेंट’, ‘बीबीए - डिजिटल मार्केटिंग’, ‘बीबीए - इव्हेंट मॅनेजमेंट’, ‘बीबीए बँकिंग अँड इन्शुरन्स’ इ. वित्त उद्योग आणि विमा क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या संधीसाठी तरुणांना सज्ज करण्याच्या उद्देशाने बँकिंग, वित्त आणि इन्शुरन्स क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापक व तज्ज्ञांनी तयार केलेल्या ‘बीबीए : बँकिंग अँड इन्शुरन्स’ या अभ्यासक्रमाविषयी माहिती करून घेऊयात..

या व्यावसायिक अभ्यासक्रमात वित्त व विमा क्षेत्राशी निगडित अशा मूलभूत व प्रगत विषयांचे ज्ञान व त्याचे व्यावहारिक जीवनातील उपयोगिता याचे प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (२०२०) नुसार विद्यार्थी ३ वर्षे पूर्ण करून ‘बीबीए : बँकिंग अँड इन्शुरन्स’ ही पदवी घेण्यास पात्र ठरतो. एकूण ६ सत्रांचा यात समावेश असतो. प्रत्येक वर्षी २ सत्रे याप्रमाणे ३ वर्षात ६ सत्रे पूर्ण करणे आणि त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

पात्रता आणि प्रवेशप्रक्रिया

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) तसेच व्यक्तिगत मुलाखत यामध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. सामाईक प्रवेश परीक्षेच्या गुणांसोबतच बारावीच्या गुणांचाही (साधारणपणे किमान ५० टक्के) विचार प्रवेश देताना केला जातो.

अभ्यासक्रमाचे स्वरूप

प्रथम वर्षात प्राथमिक स्वरूपातले व्यवस्थापन शास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्य, तंत्रज्ञान, व्यावसायिक गणित, विपणन, व्यवसाय विज्ञापन यांसारख्या विषयांचा समावेश होतो. दुसऱ्या वर्षांपासून (सत्र ३) वित्त आणि विमा क्षेत्राशी संबंधित असे विविध विषय बँकिंग, वित्त आणि इन्शुरन्स क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापक व तज्ज्ञ मंडळी शिकवतात. बँकिंग मॅनेजमेंट अँड रेग्युलेटरी फ्रेमवर्क, फानान्शियल प्लॅनिंग अँड वेल्थ मॅनेजमेंट, बिहेविअरल फायनान्स, क्रेडीट अँड रिस्क मॅनेजमेंट, इन्शुरन्स मॅनेजमेंट, रिटेल बँकिंग, क्लेम मॅनेजमेंट, फानान्शियल डेरिव्हेटिव्हज, फंडामेंटल्स ऑफ अँकच्युरिअल सायन्स, टॅक्सेशन, सिक्युरिटी ॲनॅलिसिस अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, अँटी मनी लाउजरींग, सायबर सिक्युरिटी अँड लॉज, फिन टेक आदी. विषयांच्या आकलनाबरोबरच विमा आणि वित्त क्षेत्रासाठी आवश्यक अशा कौशल्यांचा विकास होण्यासाठी तसेच प्रात्यक्षिक अनुभवासाठी विद्यार्थ्यांना बँका, विमा कंपन्या तसेच आर्थिक संस्थांमध्ये इंटर्नशिप करणे अनिवार्य आहे.

शिक्षणाच्या जागतिकीकरणाचे महत्त्व लक्षात घेता काही मोजक्या विद्यापीठांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये परकीय भाषेचे (फ्रेंच/जर्मन/स्पॅनिश/जपानी) प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत आणि सर्वांगीण विकास होणे, तसेच तो विद्यार्थी उद्योग क्षेत्रासाठी राष्ट्रीय स्तरावर तसेच जागतिक स्तरावर तयार होणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे.

नोकरी-व्यवसायाच्या संधी

‘बीबीए : बँकिंग अँड इन्शुरन्स’ यामध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवीधरास नामांकित खासगी बँका, परदेशी बँका, सरकारी बँका, विमा कंपन्या, आरोग्य सेवा, वाहनउद्योग, क्रेडिट कंपनी, विविध वित्त संस्थांसाठी सल्लागार सेवा वा नोकरी, व्यवसायाच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध आहेत.

या विविध क्षेत्रात कामाचे स्वरूप म्हणजेच जॉब प्रोफाइल हे क्रेडिट अँड रिस्क मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट बँकर, इंटर्नल ऑडिटर, इन्शुरन्स मॅनेजर, फायनान्स कन्सल्टंट, क्रेडिट अनॅलिस्ट, इन्व्हेस्टमेंट अनॅलिस्ट, टॅक्स असिस्टन्स, लोन ॲडवायझर या पद्धतीचे असू शकते.

तसेच, ‘बीबीए - बँकिंग अँड इन्शुरन्स’ झालेल्या पदवीधरास भारतात आणि परदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. एम.बी.ए बँकिंग अँड फायनान्स, पीजीडीएम, पीजीपीएम करून विद्यार्थी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू शकतो. उदयोन्मुख आर्थिक साधने, अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक अनुभवाची यांची योग्य सांगड घालून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केल्यास हा अभ्यासक्रम केवळ ज्ञानच वाढवत नाही तर वित्त आणि विमा क्षेत्रातील तज्ज्ञ होण्यास मदत करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

एबी डिव्हिलियर्स, ऐकतोस ना! प्लीज मला मदत कर... सूर्यकुमार यादवची आफ्रिकेच्या दिग्गजाला विनंती; म्हणाला, माझं करियर वाचव..

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

SCROLL FOR NEXT