DRDO Recruitment 2022  esakal
एज्युकेशन जॉब्स

DRDO Recruitment 2022 : परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी

सकाळ डिजिटल टीम

विकास संस्थामध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

DRDO Recruitment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये (DRDO) काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. DRDO च्या डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीनं (DFRL) ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) आणि डिप्लोमा अप्रेंटिसच्या (Diploma Apprentice) पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केलीय. यासाठी पात्र उमेदवार RAC च्या अधिकृत वेबसाइटवर rac.gov.in आपला अर्ज भरू शकतात. दरम्यान, पात्र अर्जदारांची वॉक-इन मुलाखतीच्या आधारे भरती केली जाईल.

DRDO च्या अधिसूचनेनुसार, एकूण 17 रिक्त जागांसाठी ही भरतीची मोहीम आयोजित करण्यात आलीय. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची संधी 3 मार्च 2022 पर्यंत आहे. दरम्यान, उमेदवारांची निवड पदवी/डिप्लोमा गुणांच्या आधारे केली जाईल. ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल, त्यांना पत्र/ईमेलद्वारे याची माहिती दिली जाणार आहे.

रिक्त जागांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता

पदवीधर शिकाऊ – 8 पदं

फूड टेक्नॉलॉजी किंवा B.Tech अथवा फूड सायन्समध्ये B.Sc असलेल्यांसाठी 4 रिक्त जागा

बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनीअरिंगमधील बी. टेकसाठी 2 रिक्त जागा

रसायन अभियांत्रिकी, पॉलिमर अभियांत्रिकी, बी.टेक किंवा बीईसाठी 2 रिक्त जागा

डिप्लोमा अप्रेंटिस - 9 पदं

मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमासाठी 3 जागा

हॉटेल मॅनेजमेंट किंवा केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी 3 जागा

इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा असलेल्यांसाठी रिक्त जागा

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी 1 जागा रिक्त आहे.

दरम्यान, 2021 मध्ये उत्तीर्ण झालेले आणि MHRDNATS पोर्टलवर नोंदणी केलेले उमेदवारच अर्ज करू शकतात.

वेतनमान

पदवीधर प्रशिक्षणार्थी : 9000 रुपये

डिप्लोमा अप्रेंटिस : 8000 रुपये

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : उमेदवार rac.gov.in वरून फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि 3 मार्च 2022 पूर्वी भरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT