education news ISC 12th Result  99 percent students passed
education news ISC 12th Result 99 percent students passed esakal
एज्युकेशन जॉब्स

ISC 12th Result : आयएससी बारावीचा निकाल जाहीर; ९९.३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनिशन्स (सीआयएससीई) यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या आयएससी बारावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. देशातील एकूण ९६ हजार ९४० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील ९९.३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

‘सीआयएससीई’च्या एक हजार २२८ शाळांमधून ५१ हजार १४२ विद्यार्थी आणि ४५ हजार ७९८ विद्यार्थिनींनी आयएससीची परीक्षा दिली. त्यातील ९९.५२ टक्के विद्यार्थिनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त आहे. तर परीक्षेत ९९.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा ४९ विषयांत १२ भारतीय भाषा, ५ परदेशी भाषा आणि २ क्लासिकल भाषांमध्ये झाली. या परीक्षेसाठी संपूर्ण देशात उत्तर विभागातून सर्वाधिक नोंदणी झाली आहे. यामध्ये छत्तीसगड, चंदीगड, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, नवी दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर दक्षिण विभागातील ९९.८१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेत ठाण्यातील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील उपासना नंदी या विद्यार्थिनीने ९९.७५ टक्के गुण मिळवीत देश पातळीवरील गुणवत्ता यादीत पहिला क्रमांक आला आहे. तर पुण्यातील बिशप स्कूलमधील कल्पना पांडे हिने आणि कनिष्क हेगडे याने ९९.२५ टक्के गुण मिळवीत देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

‘आयएससी’ बारावीच्या निकालाचा तपशील

तपशील : विद्यार्थी : विद्यार्थिनी

उत्तीर्ण झालेले : ५०,७६१ : ४५,५७९

अनुत्तीर्ण झालेले : ३८१ : २१९

एकूण परीक्षा दिलेले : ५१,१४२ : ४५,७९८

विभागनिहाय निकाल

विभाग : उत्तीर्ण विद्यार्थी : उत्तीर्णतेची टक्केवारी

उत्तर : ४४,२११ : ९९.४३ टक्के

पूर्व : ३६,५०१ : ९९.१८ टक्के

पश्चिम : ६,२०२ : ९९.५८ टक्के

दक्षिण : ९,१४७ : ९९.८१ टक्के

परदेशी : २७९ : ९९.६४ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT