emotional skills
emotional skills sakal
एज्युकेशन जॉब्स

भावनिक कौशल्यांचे प्रभावी व्यवस्थापन

डॉ. मिलिंद नाईक

शाळेत एखादी स्पर्धा असते. आपण खूप जिवापाड मेहनत करतो आणि स्पर्धेत भाग घेतो. कधी आपल्याला यश मिळते, तर कधी अपयश! यशाने आपण आनंदी होतो, तर अपयशाने खट्टू होतो. आनंद, दुःख, दया, राग, प्रेम, मत्सर या भावना सर्वच मानवांना व काही प्रमाणात सर्वच सजीवांना असतात. मन म्हणजे भावनांचं उगमस्थान. तुम्हाला आदर्शवत वाटणाऱ्या प्रसिद्ध अथवा अप्रसिद्ध व्यक्ती डोळ्यांसमोर आणा.

या व्यक्तींमध्ये विवेकानंद, लोकमान्य टिळक, आगरकर असे देशभक्त असतील किंवा आइनस्टाइन, जयंत नारळीकर, अब्दुल कलाम यांसारखे शास्त्रज्ञ असतील किंवा पु. ल. देशपांडे, झाकीर हुसेन यांसारखे कलाकार असतील किंवा तुमचे आई-वडील, मोठे भाऊ-बहीण, शिक्षक यांसारख्या जवळच्या व्यक्ती असतील. त्यांच्यातल्या मोठेपणाचं सूत्र शोधायला गेलात तर ते आहे त्यांच्यामध्ये असलेल्या भावानिक कौशल्यांमध्ये!

स्वतःबद्दलची जागरूकता

आपले भावनिक कौशल्य कसे आहे, ते शोधण्यासाठी सर्वप्रथम स्वतःबद्दलची जागरूकता वाढवणे, स्वतःमध्ये डोकावून पाहणे गरजेचे आहे. मी कसा आहे? मी कशी आहे? याचा शोध घेणे आवश्यक आहे. तुम्हाला आनंद, दुःख, दया, राग, प्रेम, मत्सर, असूया या भावना कोणकोणत्या प्रसंगात अनुभवायला येतात?

तुमच्या या भावना तुम्ही कशा व्यक्त करता? कोणत्या भावनांचा वारंवार अनुभव घेता? आपले आई, बाबा, मित्र-मैत्रिणी, शिक्षक आपल्याविषयी काय म्हणतात? उदाहरणार्थ, शांत आहे, लाजाळू आहे, चिडका आहे, अस्थिर आहे, संयमी आहे हे आठवा. आपण कोणीच केवळ सद्‌गुणांचे पुतळे नसतो, ना की पूर्णतः दुर्गूणी. आपल्या भावनांचे नियंत्रण आपल्या हातात आहे का?

अनेकदा इतरांनी चिडवलं म्हणून आपण संतापतो, स्पर्धेचं वातावरण असलं की, ताणाने हातपाय कापायला लागतात. आपल्याला आपल्या भावनांसाठी इतर परिस्थिती जबाबदार आहे, असे वाटू लागले की, गडबड होते. बाह्यप्रसंग, बाह्य परिस्थिती यांमुळे आपल्या मनात भावना येतात हे खरे, पण आपल्या भावनांना ते पूर्णतः जबाबदार नसतात.

परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले की आपण विचार करतो सरांनी मुद्दामूनच पेपर कडकपणे तपासले किंवा मला जमतच नाही? या विषयांचा अभ्यास! किंवा आता मित्रमैत्रिणी, घरचे काय म्हणतील याचा ताण येतो. खरे तर, उत्तरपत्रिका नीट पाहून कशामुळे गुण गेले हे पाहिले पाहिजे आणि पुढच्या वेळी त्या गोष्टीचा अधिक अभ्यास केला पाहिजे. राग येणे, निराशा वाटणे, ताण येणे, यांपेक्षा असे का घडले? या विवेकी विचारांतूनच भावनांवर नियंत्रण करता येते.

समानुभूती

बाबा, तुम्ही खूप दमलेले दिसत आहात. ऑफिसमध्ये खूप काम होतं का? आई तू खूप वैतागलेली दिसतेस, काही अडचण आहे का? यांसारखे संवाद आपल्या तोंडात येतात का? हे संवाद निश्चितपणे हे दर्शवतात की, आपल्याला दुसऱ्यांच्या भावना जाणवतात, समजतात; यालाच आपण म्हणूया समानुभूती ! दुसऱ्याच्या भूमिकेत शिरणं, दुसऱ्याचा चष्मा घालून पाहणं!

लेखक, कवी, अभिनेत्यांमध्ये इतरांच्या भावना जाण्याचे विलक्षण कौशल्य असतेच, पण त्याचबरोबर बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्यांमध्ये सामाजिक सेवेच्या व्रताची प्रेरणा या समानुभूतीमधूनच आलेली असते. एवढेच नाही, तर एक परिणामकारक नेता, अधिकारी, चांगला मित्र होण्यासाठीदेखील समानुभूतीची आवश्यकता असते.

भावनिक परिपक्वता

भावनिक परिपक्वता म्हणजे काय? तर, प्रसंगांचं भान ठेवून आपल्या भावना व्यक्त करणे. आपल्या वागण्याचे, बोलण्याचे, भावनांचे पडसाद काय उमटतात? याचा अंदाज घेऊन विवेकाने वागणं. भावनिक परिपक्वता म्हणजे हरल्यावर, स्वतःच्या भावनांचा उद्रेक थोपवून प्रतिस्पर्ध्याला चांगल्या खेळाबद्दल मनमोकळी दाद देणं, स्वतःच्या अडचणी, दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं. कठीण परिस्थितीत प्रसंगावधान राखणं ! यासाठी खालील काही गोष्टी जरूर करून पाहा.

तपासणी व सुधारणा

दैनंदिनीत रोजच्या रोज आपल्या भावनांचा आलेख लिहून पाहा. आपल्यातल्या चांगल्या - वाईट गुणांची यादी करून ठेवा. विविध प्रसंगात दुसऱ्यांच्या मनात काय चालले आहे, त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. या सर्वांचा आपल्याला जीवनकार्य निवडण्यासाठी उपयोग होणार आहे. भावनिक कौशल्यांचा उपयोग दैनंदिन जीवनापासून ते नेतृत्व करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आहे. स्वतःची निरीक्षणे नोंदवल्यानंतर आपण कुठे कमी पडत असू, तर सुधारणा करण्याचा अवश्य प्रयत्न करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT