Admissions esakal
एज्युकेशन जॉब्स

'या' कारणाने रखडली अकरावीची प्रवेशप्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दहावीचा निकाल जाहीर होऊन १५ दिवस उलटूनही अकरावीची प्रवेशप्रक्रिया ठप्पच आहे. सीबीएसईसह (CBSC) अन्‍य बोर्डांतील दहावीचा निकाल जाहीर न झाल्‍याने प्रक्रिया रखडल्‍याची चर्चा आहे. लवकरात लवकर प्रक्रिया राबविण्याची मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत प्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत. गेल्‍या ३० मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. ऑनलाइन अर्जांतर्गत भाग एक भरण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली होती. यात विद्यार्थ्यांची वैयक्‍तिक माहिती, आरक्षणाचा तपशील आदींचा समावेश होता, तर महाविद्यालय व शाखा निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली नव्‍हती. निकाल जाहीर झाल्‍यानंतर अर्जाच्या भाग दोनला सुरवात होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत होती. मात्र, १७ जूनला निकाल जाहीर होऊनही अद्यापपर्यंत अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

24 हजार नोंदणी

आतापर्यंत अर्जाचा भाग एक भरण्याच्‍या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २३ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे साडेबावीस हजार जागा उपलब्‍ध आहेत. मात्र, उपलब्‍ध जागांच्‍या तुलनेत अधिक नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अर्जाचा भाग दोनकडे लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT