Job Alert Sakal
एज्युकेशन जॉब्स

Job Alert: ग्रॅज्युएशन पूर्ण नसलं तरी मिळतायत लाखो रुपये पगाराच्या नोकऱ्या; कुठे ते जाणुन घ्या?

ग्रॅज्युएशन शिवाय नोकरी मिळणे कठीण असल्याचा भारतीय जॉब मार्केटमध्ये समज आहे.

राहुल शेळके

Job Alert: चांगल्या नोकरीसाठी चांगले शिक्षण आवश्यक आहे. पदवीशिवाय नोकरी मिळणे कठीण असल्याचा भारतीय जॉब मार्केटमध्ये समज आहे. पण, आता कंपन्यांचा दृष्टिकोन बदलत आहे.

अशी अनेक फील्ड्स आहेत, जिथे ग्रॅज्युएशनशिवाय चांगल्या पॅकेजेसच्या नोकऱ्याही उपलब्ध आहेत. लिंक्डइनच्या अहवालाने वर्षानुवर्षे चालत आलेला समजही बदलला आहे.

कोरोनानंतर कंपन्यांचा दृष्टीकोन बदलला असून आता त्या पदवीऐवजी कौशल्याला प्राधान्य देत आहेत. ZipRecruiter नुसार आता पदवीचे महत्त्व कमी होत आहे.

ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स असेही म्हणते की 2030 नंतर, बहुतेक नवीन नोकऱ्यांना पदवी आवश्यक नाही. त्याच धर्तीवर, लिंक्डइनने 2021 ते 2023 दरम्यान नोकरी करणाऱ्यांच्या प्रोफाइलची तपासणी केली असून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

कन्सल्टंट हे सर्वात मोठे क्षेत्र आहे जे बॅचलर डिग्रीशिवाय नोकऱ्या मिळू शकतात. येथे, 2021 ते 2022 दरम्यान, 34 टक्के नोकर भरतीत वाढ झाली आहे. त्यासाठी पदवीऐवजी स्पेशलायझेशनला महत्त्व देण्यात आले आहे.

पदवी नसतानाही ग्राहक सल्लागार, व्यवसाय सल्लागार, सोल्युशन कन्सल्टंट अशा पदांसाठी लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

पदवीशिवाय नोकऱ्या देण्याच्या बाबतीत मार्केटिंग हे दुसरे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात, सोशल मीडिया व्यवस्थापकांपासून मार्केटिंग आणि समन्वयकांपर्यंतच्या पदांसाठी भरती केली जाते.

कंपन्यांसाठी कँपेन चालवणे, ऑनलाइन प्रेस मॅनेज करणे या सारखे कार्यक्रम करणे हे त्यांचे काम आहे. संशोधन हे असे क्षेत्र आहे, ज्यासाठी सामान्यतः खूप शिक्षित लोकांची आवश्यकता असते.

परंतु, आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ, व्यवसाय विश्लेषक आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासारख्या पदांसाठी पदवीशिवाय नोकऱ्या दिल्या जात आहेत.

या क्षेत्रात डेटा विश्लेषण आणि संशोधन सहाय्यक या पदांसाठी नोकऱ्या दिल्या जात आहेत. कंपन्या बॅचलर डिग्रीशिवाय ह्युमन रिसोर्सेस-एचआर पदांसाठी नोकऱ्याही देत आहे. कंपन्या पदवीपेक्षा संवाद आणि नेतृत्व कौशल्याला अधिक महत्त्व देत आहेत.

त्यांचे काम कंपन्यांसाठी पात्र आणि कार्यक्षम कर्मचारी शोधणे आणि कार्यालयात चांगले कामाचे वातावरण राखणे हे आहे.

मीडिया आणि कम्युनिकेशनच्या क्षेत्रातही नॉन-बॅचलर पदवीधरांसाठी नोकरीच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रातील कंपन्या लेखक, production assistant, production manager या पदांसाठी नोकऱ्या देतात. याशिवाय कंटेंट क्रिएटर्समध्ये अनेक नोकऱ्या दिल्या जात आहेत.

ZipRecruiter नुसार, या नोकरीसाठी, 1 लाख ते 1.67 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.25 कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज जॉब ऑफर केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT