Animal Doctor sakal
एज्युकेशन जॉब्स

कामातून करा प्राणीप्रेम व्यक्त

सध्याच्या काळात प्राण्यांचे डॉक्टर होणे हे उत्तम करिअर ठरू लागले आहे. त्यासाठी पदवी शिक्षण आहे - बी.व्ही.एस्सी अँड ए.एच. म्हणजेच बॅचलर इन व्हेटरिनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

सध्याच्या काळात प्राण्यांचे डॉक्टर होणे हे उत्तम करिअर ठरू लागले आहे. त्यासाठी पदवी शिक्षण आहे - बी.व्ही.एस्सी अँड ए.एच. म्हणजेच बॅचलर इन व्हेटरिनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी. खासकरून प्राण्यांसाठी पालन, पोषण, उपचार आणि प्रजनन क्षेत्रात आवडीने काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही पदवी शास्त्रोक्त पद्धतीने कार्य करण्यासाठी उपयुक्त आहे.

कालावधी व पात्रता

बारावी सायन्सनंतरचा हा नियमित पूर्ण वेळ वैद्यकीय अभ्यासक्रम आहे. याचा कालावधी साडेपाच वर्षांचा आहे. बारावी सायन्समध्ये पीसीबी ग्रूप आवश्यक असून, नीटच्या परीक्षेतील मेरिटनुसार प्रवेश ठरतो. एमबीबीएस किंवा अन्य वैद्यकीय पदवीसाठी हव्या असणाऱ्या गुणांपेक्षा थोडे कमी गुण असले तरीही प्रवेश मिळू शकतो.

अभ्यासक्रम आणि विषय

साडेपाच वर्षांच्या कालावधीत दहा सेमिस्टर असतात. मायोलॉजी, व्हेटर्नरी ॲनाटॉमी, ऑस्टिओलॉजी, मसल फिजिओलॉजी, पॅरासाइट्स, व्हेटर्नरी पॅथॉलॉजी, सेन्स ऑर्गन्स ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांची शारीरिक रचना, प्राण्यांच्या अंतर्गत शारीरिक क्रिया, पोल्ट्री, मिल्क इंडस्ट्री, लसीकरण, औषधे आदी विषय अभ्यासक्रमात असतात. थेअरी लेक्चरसोबतच प्रॅक्टिकलही महत्वाचे असतात. एक वर्षाची इंटर्नशिप असते.

उच्च शिक्षण

परदेशात जाऊन डी.व्ही.एम. (डॉक्टर ऑफ व्हेटरिनरी मेडिसीन ) हा कोर्स करता येऊ शकतो. डीव्हीएम हा चार वर्षांचा कोर्स आहे. त्यासाठी जीआरईची परीक्षा द्यावी लागेल. काही परदेशी विद्यापीठांमध्ये ‘जीआरई’ऐवजी मेडिकल कॉलेज ऍडमिशन टेस्ट (MCAT) किंवा व्हेटरिनरी कॉलेज ॲडमिशन टेस्ट (VCAT) चे गुण ग्राह्य धरले जातात.

स्कोप

पोल्ट्री, मांस, दूध ही मोठ्या मागणीची कार्यक्षेत्रे आहेत, तिथे प्राण्यांचे तज्ज्ञ, डॉक्टर अपेक्षित असतात. काही डॉक्टर कुत्रे, मांजर अशा पाळीव प्राण्यांवर उपचार करतात. त्यांचे स्वतंत्र क्लिनिक असते किंवा ते प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असतात. भारतात शासकीय रचनेतूनसुद्धा प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. काही डॉक्टर शेतात काम करणाऱ्या गुरांसाठी, जनावरांसाठी काम करतात. प्राणी आणि माणसे यांना एकमेकांपासून आजार उद्भवू नयेत म्हणून संशोधन आणि प्रतिबंधात्मक काम करणारे काही तज्ज्ञ डॉक्टर्स असतात. स्पर्धांसाठी असणाऱ्या घोड्यांना अधिक शुश्रूषेची गरज असते.

विविध संधी

प्राण्यांचे हृदयविकार, त्वचारोग, दातांचे आरोग्य, पचनसंस्थेचे विकार, सर्जरी आदी महत्त्वाचे विषय हाताळावे लागतात. त्यासाठीचे स्पेशलायझेशन करता येते.

भारतात शासकीय रचनेतून कामाच्या संधी बी.व्ही.एस्सी पदवीधरांसाठी असतात. शासकीय रचनेच्या ताब्यात असलेले प्राणी, संरक्षण दलातील आणि पोलिस दलातील प्राणी खासकरून प्रशिक्षित कुत्री, शेतीविभागाशी संबंधित प्राणी, प्राणी उद्यानातील जंगली प्राणी, अभयारण्ये, वन्यजीव विषयात काम करणाऱ्या संस्था या ठिकाणी अशा पदवीधरांना कामाची संधी असते.

काही मंडळी शिक्षक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशिक्षक म्हणूनही काम पाहतात. प्राण्यांच्या आरोग्याविषयी संशोधन करण्याची आवड असणारी मंडळी व्हेटरिनरी रिसर्चमध्ये मोठे करिअर करू शकतात. प्राण्यांसंबंधित असणाऱ्या मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, औषधनिर्माण आदी क्षेत्रांतसुद्धा नोकरीच्या संधी असतात.

सकारात्मक चित्र

हल्ली माणसांइतकेच प्राण्यांना प्रेम द्यावे हा विचार नव्याने रुजत आहे. प्राण्यांची काळजी घेणारी मंडळी वाढत असल्याने प्राण्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावे ही मानसिकता अर्थातच वाढते आहे. शहरांमध्ये पाळीव प्राण्यांसाठी वेळ देणारी अनुकूलता हीसुद्धा या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे.

या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. शहरी भागातील विद्यार्थीसुद्धा या कार्यक्षेत्राचा विचार करत आहेत. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. इतर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला नाही, पण डॉक्टरच व्हायचे होते, म्हणून प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे हा विचारसुद्धा चांगला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT