Medical Student Sakal
एज्युकेशन जॉब्स

Medical Admission : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ

एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीयुएमएस अशा वैद्यकीय पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता येत्या सोमवारपर्यंत (ता. १०) मुदतवाढ देण्यात आली.

मीनाक्षी गुरव

एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीयुएमएस अशा वैद्यकीय पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता येत्या सोमवारपर्यंत (ता. १०) मुदतवाढ देण्यात आली.

पुणे - एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीयुएमएस अशा वैद्यकीय (Medical) पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (Admission) विद्यार्थ्यांना (Student) आता येत्या सोमवारपर्यंत (Monday) (ता. १०) मुदतवाढ (Extension) देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत जवळपास ५५ हजार ७६२ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. या अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी गुरूवारी (ता.१३) जाहीर केली जाणार आहे.

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेली नोंदणी ही तब्बल नऊ ते दहा हजारांनी कमी आहे. याचा विचार करून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) प्रवेशासाठी नोंदणी करण्यात मुदतवाढ दिली आहे. प्रवेश नोंदणीसाठी दिलेल्या मुदतवाढीचे सविस्तर वेळापत्रक उमेदवारांच्या माहितीसाठी प्रवेश परीक्षा कक्षाच्या ‘www.mahacet.org’ या अधिकृत संकेतस्थळावर ‘नीट-युजी’ येथे उपलब्ध करून दिले आहे. तसेच सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक सीईटी सेलमार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी दिली.

विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी -

अभ्यासक्रम : २०२०-२१ मध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी : २०२१-२२मध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी (आतापर्यंत)

एमबीबीएस/बीडीएस/बीएएमएस/बीएचएमएस/बीयुएमएस/बीपीटीएच/बीओटीएच/ नर्सिंग आणि इतर : ६४,६४५ : ५५,७६२

एमडीएस : १,३५१ : १,०६७

या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ लागू :

- एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बी (पी ॲण्ड ओ), बी.एस्सी (नर्सिंग)

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीचे सुधारित वेळापत्रक:

तपशील : कालावधी

- अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणीसाठी करणे : १० जानेवारी (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)

- नोंदणी शुल्क भरणे (ऑनलाइन पद्धतीने) : ११ जानेवारी (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)

- प्रवेशासाठी मूळ कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करणे : ११ जानेवारी

- तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : १३ जानेवारी (सायंकाळी पाच वाजता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT