Eleventh CET
Eleventh CET sakal media
एज्युकेशन जॉब्स

‘सीईटी’च्या अर्जासाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ (CET)साठी आतापर्यंत ऑनलाइन अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. अशा विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (ता. १६) अर्ज करता येणार आहे. (Extension for application for CET)

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, व्यवस्थापन अशा विविध अभ्यासक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ‘सीईटी’ घेण्यात येते. या परीक्षेसाठी अद्याप अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना एक विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी दिली आहे. ‘सीईटी’साठी आतापर्यंत ऑनलाइन अर्ज सादर केलेला नाही, असे विद्यार्थी, तसेच अपूर्ण अर्ज भरलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना आता अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या अर्जामध्ये विद्यार्थ्यांना आपले पूर्ण नाव, स्वाक्षरी, फोटो आणि परीक्षा केंद्रामध्ये ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या लॉगीनमधून दुरुस्ती करण्यासाठीही संधी दिल्याची माहिती कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली.

ऑनलाइन नोंदणीबाबत

  • ‘सीईटी’ परीक्षा : एमएचटी-सीईटी, एमएएच-एमबीए, एमएएच-एमसीए, एमएएच-एम.आर्च, एमएएच- एम.एचएमसीटी, एमएएच- बीएचएमसीटी

  • ऑनलाइन नोंदणी, अर्ज निश्चिती : १६ ऑगस्टपर्यंत

  • अर्जातील दुरुस्ती : १४ ते १६ ऑगस्ट

  • संकेतस्थळ : www.mahacet.org

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT