ITI admission process starts  sakal
एज्युकेशन जॉब्स

आयटीआय प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्लीतील प्रशिक्षण महासंचालनालयाने नव्याने तुकड्यांना प्रवेशाची परवानगी दिल्याने प्रवेशाची ही मुदत वाढविण्यात आली

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नवी दिल्लीतील प्रशिक्षण महासंचालनालयाने नव्याने तुकड्यांना प्रवेशाची परवानगी दिल्याने प्रवेशाची ही मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार रिक्त जागांवरील प्रवेशासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत अद्याप प्रवेश अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. तर सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे रिक्त जागांवरील प्रवेशासाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे प्रवेश मिळतील. संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आयटीआय प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक : तपशील : कालावधी

  • नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, प्रवेश अर्ज निश्चित करणे : १५ डिसेंबरपर्यंत

  • सर्व उमेदवारांच्या समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविणे : १६ डिसेंबर (दुपारी ३ वाजता)- संस्थास्तरीय समुपदेशन फेरीतंर्गत प्रवेशोच्छुक व नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेत (सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत) व्यक्तीश: उपस्थित राहणे, फेरीसाठी हजेरी नोंदविलेल्या विद्यार्थ्यांमधून त्याचदिवशी गुणवत्ता यादी तयार करून प्रकाशित करणे, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करणे : ३१ डिसेंबर

  • खासगी आयटीआय स्तरावरील प्रवेशासाठी संबंधित संस्थेतील जागांवर प्रवेश निश्चित करणे : ३१ डिसेंबर

विद्यार्थी व पालकांसाठी सूचना

  • सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक

  • कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेव्यतीरिक्त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरणार नाही

  • प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळ याबाबत शंका असल्यास जवळच्या आयटीआयशी संपर्क साधावा

‘आटीआय’ प्रवेशाच्या माहितीसाठी संकेतस्थळ : https://admission.dvet.gov.in आणि www.dvet.gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT