पोलिस भरतीचे ठरले वेळापत्रक ! 'या' दिवशी लेखी परीक्षा Canva
एज्युकेशन जॉब्स

पोलिस भरतीचे ठरले वेळापत्रक ! 'या' दिवशी लेखी परीक्षा

पोलिस भरतीचे ठरले वेळापत्रक ! "या' दिवशी लेखी परीक्षा

तात्या लांडगे

तत्कालीन फडणवीस सरकारने 72 हजार पदांची मेगाभरती जाहीर केली. मात्र, सरकार बदलले, तरीही मेगाभरती झालेली नाही.

सोलापूर : दोन वर्षांपासून रखडलेल्या साडेपाच हजार पोलिस पदांच्या भरतीला (Recruitment of police posts) अखेर मुहूर्त सापडला आहे. 3, 4, 5, 6, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. त्यानंतर गणेशोत्सव (Ganeshotsav) झाल्यावर उर्वरित परीक्षा पार पडणार आहेत. सुरवातीला लेखी परीक्षा होणार असून त्यानंतर मैदानी चाचणी होईल, अशी माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाने (Director General of Police) दिली.

तत्कालीन फडणवीस सरकारने 72 हजार पदांची मेगाभरती जाहीर केली. मात्र, सरकार बदलले, तरीही मेगाभरती झालेली नाही. दरम्यान, राज्याची आर्थिक स्थिती विस्कटलेली असतानाही अत्यावश्‍यक विभागातील पदभरतीला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार 2019 मधील प्रलंबित पोलिस भरतीला आता सुरवात झाली आहे. ऑक्‍टोबरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करून नव्या पोलिस कर्मचाऱ्यांना नियुक्‍ती दिली जाणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये नव्या पदभरतीला सुरवात होईल. 2020 मधील सात हजार पोलिस पदांची बिंदुनामावली मंजूर करून घेण्यात आली आहे. आता 2021 मधील बिंदुनामावली मंजूर झाल्यानंतर एकूण 12 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, दरवर्षी पोलिस भरतीला उमेदवारांची मोठी संख्या असते. या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात सर्वप्रथम मैदानी चाचणी आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांची लेखी परीक्षा घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, सध्या त्याला उमेदवारांचा विशेषत: ग्रामीण भागातील तरुणांचा विरोध असल्याने तो निर्णय प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले.

राज्यातील साडेपाच हजार पोलिस भरतीची परीक्षा 3 सप्टेंबरपासून सुरू होईल. ऑक्‍टोबरअखेर परीक्षा पूर्ण होऊन नियुक्‍त्या देण्याचे नियोजन आहे. 2020 आणि 2021 मधील 12 हजार पदांची भरती करण्याच्या दृष्टीनेही नियोजन सुरू आहे.

- संजीव कुमार, अप्पर महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई

2021 च्या रिक्‍त पदांना मंजुरी नाहीच

राज्यातील अतिमहत्त्वाच्या, अत्यावश्‍यक विभागात पोलिस विभागाचा समावेश आहे. गृह, आरोग्य, मेडिकल विभागाच्या पदभरतीला यापूर्वीच वित्त विभागाने परवानगी दिली आहे. राज्याच्या पोलिस दलात हजारो पदे रिक्‍त असून त्याची माहिती महासंचालक कार्यालयाने संकलित केली आहे. दरम्यान, मागील दोन-तीन वर्षांत अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून कोरोनामुळे अनेकजण शहीद झाले आहेत. तरीही, पोलिस दलातील 2021 मधील रिक्‍त पदांना अजून मंजुरी मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Humanity Helps: नाझियाच्या मदतीला धावली माणुसकी! ती सहा महिन्यांपासून देतेय आजाराशी झुंज; उपचारासाठी लाखोंचा खर्च..

Ambajogai Crime : कला केंद्रात कामाचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

SCROLL FOR NEXT