Competition Exam 
एज्युकेशन जॉब्स

एमआयटी-एसओजी आयोजित 'भारतीय राजकारणात तरुणांना संधी' विषयी विनामुल्य वेबिनार

जाहिरात

सध्या शिक्षणाचं एकूणच स्वरूप बदलताय. आजचा तरुण महत्त्वाकांक्षी आहे. राजकीय नेतृत्व करण्यासाठीही अनेकजण पुढं येत आहेत. अर्थातच या क्षेत्रातही शैक्षणिक पात्रता देखील महत्त्वाची झाली आहे. विद्यार्थीही याचा चांगला पाठपुरावा करत आहेत. त्यामुळेच देशातील अग्रगण्य 
विद्यापीठांमधून या शैक्षणिक मागणीची पूर्तता करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगात भारत हा एकमेव लोकशाही प्रधान देश आहे की, ज्या देशात तरुण ही सर्वांत मोठी शक्ती आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे, हे त्याचेच प्रमाण आहे. २०२४-२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे आणि हे उदिद्ष्ट गाठण्यासाठी देशातील तरुण हे सर्वांत मोठं बलस्थान आहे. या वाटचालीत राजकीय नेतृत्वाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. कारण, भविष्यात तेच आपले नेतृत्व करणार आहेत. राजकीय परिस्थिती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हाताळण्यासाठी देशाला प्रभावी, सक्रीय, क्षमता असणारे सुशिक्षित, तरुण आणि ज्ञानी राष्ट्रीय नेत्यांची गरज आहे. जर, राजकारणातल्या मुख्य प्रवाहात तरुणांना संधी मिळाली तर, भारत निश्चितच एक विकसित राष्ट्र होईल.

सध्या भारतातील राजकारण हे कात टाकत आहे. 2012 पासून मोठ्या प्रमाणावर बदल बघायला  मिळत आहेत. देशातील शिक्षित नागरिक रोजच्या घडामोडींमध्ये सक्रीय सहभाग घेत आहेत. आपली मते नोंदवत आहेत. राष्ट्राशी निगडीत महत्वाच्या विषयांमध्ये ते सहभाग घेत आहेत. राजकारणातही फंक्शनल कन्सल्टंटचा (सल्लागार) ट्रेंड दिसू लागला आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष, अधिकारी, नेते त्यांची नेमणूक करताना दिसत आहेत. त्यामुळं तरुणांसाठी ही एक वेगळी संधी निर्माण झाली आहे. एक उत्तम करिअर म्हणून, हे क्षेत्र पुढं येत आहे.

हा ट्रेंड लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष यांनी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटची (एमआयटी-एसओजी)संकल्पना मांडली. समाजाच्या सर्व स्तरांतून देशासाठी उत्साही आणि वचनबद्ध राजकीय नेतृत्व निर्माण करण्याची त्यांचा संकल्प आहे.  याचसाठी सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एमआयटी - स्कुल ऑफ गव्हर्नमेंट आणि सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने "भारतीय राजकारणात तरुणांना संधी" याविषयी विनामूल्य वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये तरुणांना एकूणच राजकारणातील संधी आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी तसेच राजकारणात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाविषयी विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरु असून आपण आताच दिलेल्या लिंकवर क्लिककरून आपले नाव नोंदवू शकता.

वेबिनार विषय : "भारतीय राजकारणात तरुणांना संधी"
दिनांक : सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२०.
वेळ : सकाळी ११ वाजता.
नावनोंदणीसाठी लिंक -https://us02web.zoom.us/webinar/register/WN__XkJvaXzQruW7fKoxvsIdg

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT