Engineering Diploma Admission
Engineering Diploma Admission esakal
एज्युकेशन जॉब्स

अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अकरावीच्या (FYJC) केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली नियमित फेरी जाहीर झाली असून, विद्यार्थ्यांना शनिवारपासून (ता. १४) अर्ज करता येणार आहे. महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा मंगळवारपासून (ता. १७) उपलब्ध होणार आहे. या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी २७ ऑगस्टला जाहीर होईल. उच्च न्यायालयाच्या (high court) आदेशानुसार राज्य सरकारने अकरावी प्रवेशाची ‘सीईटी’ रद्द केली असून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली आहे.

पुणे (pune), पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad), मुंबई (mumbai), नागपूर (nagpur), नाशिक (Nashik), अमरावती (amravati)या महापालिका क्षेत्रात ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणी प्रचलित पद्धतीनुसार प्रवेश दिले जाणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. यंदा चार नियमित प्रवेश फेऱ्या होणार असून त्याचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुल्क भरण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जादा तास घेऊन पूर्ण करण्याची जबाबदारी कनिष्ठ महाविद्यालयांवर निश्चित केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

  • पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य असेल

  • पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये ‘ब्लॉक’ केले जाईल. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीमध्ये संधी दिली जाईल

  • निश्चित झालेला प्रवेश विद्यार्थ्यांना रद्द करायचा असल्यास संबंधित महाविद्यालयांना सांगावे.

  • घेतलेला प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश फेऱ्यांमध्ये ‘ब्लॉक’ करण्यात येईल आणि त्यांना विशेष फेरीत संधी असेल.

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक (पहिली फेरी)

तपशील कालावधी

  • विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नोंदणी

  • अर्जाचा भाग एक भरून सबमिट करणे

  • संबंधित शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रामार्फत अर्ज पडताळणी करणे १४ ते २२ ऑगस्ट

  • अर्ज भरणे त्यात दुरुस्ती करणे आणि अर्ज पडताळून घेणे

  • महाविद्यालयांतील कोट्यांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करणे

  • उपलब्ध जागांची माहिती दर्शविणे, १७ ते २२ ऑगस्ट

  • पहिल्या फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडणे (अर्जाचा भाग दोन भरणे) १७ ते २२ ऑगस्ट

  • महाविद्यालयांतील कोट्यांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करणे

  • कोट्यांतर्गत प्रवेश करणे, व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यांतील जागा समर्पित करणे

  • सर्वसाधारण तात्पुरती (प्रोव्हिजनल) गुणवत्ता यादी जाहीर करणे २३ ऑगस्ट

  • तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती, आक्षेप नोंदवणे २३ ते २४ ऑगस्ट

  • अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करण्याची प्रक्रिया २५ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट

  • अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे २७ ऑगस्ट

  • विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ॲलॉट झालेले महाविद्यालय दिसणे,

  • महाविद्यालयांना ॲलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची यादी दिसणे,

  • प्रवेश फेरीचा कट ऑफ जाहीर होणे

  • विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस पाठविणे

  • प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करणे २७ ते ३० ऑगस्ट

  • ॲलॉट झालेल्या महाविद्यालयांतील प्रवेश निश्चित करणे

  • प्रवेश नाकारणे किंवा रद्द करणे

  • कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू राहिली

  • महाविद्यालयांमार्फत व्यवस्थापन कोट्यातील जागा समर्पित करणे

  • अकरावी प्रवेशासाठी नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू राहील

  • महाविद्यालयांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करणे ३० ऑगस्ट (रात्री आठपर्यंत)

  • दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील दर्शविणे ३० ऑगस्ट (रात्री १० पर्यंत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Earth's Core Slowing Down : पृथ्वीच्या गाभ्याचं फिरणं झालंय कमी;दिवसाच्या लांबीवर परिणाम?संशोधनातून समोर आलेलं रहस्य जाणून घ्या

Viral Video: भाजी विक्रेती ओरडतच राहिली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi Live Updates : लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन!

SCROLL FOR NEXT