Government Job  google
एज्युकेशन जॉब्स

Government Job : पदवीधरांसाठी नोकरीची संधी; ९० हजार ते अडीच लाखांपर्यंत पगार

देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली गेल इंडिया देशातील नैसर्गिक वायू व द्रवित पेट्रोलियम वायूचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.

नमिता धुरी

मुंबई : Gail India ने २७७ मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी आणि अधिकारी पदांवर थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

गेल (इंडिया) लिमिटेड ही भारतातील सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली गेल इंडिया देशातील नैसर्गिक वायू व द्रवित पेट्रोलियम वायूचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

शैक्षणिक पात्रता

अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदनिहाय अनुभव

एकूण रिक्त जागा - २७७ पदे

मुख्य व्यवस्थापक (नूतनीकरणक्षम ऊर्जा) – ५ पदे

वरिष्ठ अभियंता (नूतनीकरणक्षम ऊर्जा) – १५ पदे

वरिष्ठ अभियंता (केमिकल) – १३ पदे

वरिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – ५३ पदे

वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – २८ पदे

वरिष्ठ अभियंता (इंस्ट्रुमेंटेशन) – १४ पदे

वरिष्ठ अभियंता (Geltel (TC/TM)) – ३ पदे

वरिष्ठ अभियंता (मेटलर्जी) – ५ पदे

वरिष्ठ अधिकारी (अग्नी आणि सुरक्षा) – २५ पदे

वरिष्ठ अधिकारी (C&P) – ३२ पदे

वरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग) - २३ पदे

वरिष्ठ अधिकारी (वित्त व लेखा) – २३ पदे

वरिष्ठ अधिकारी (मानव संसाधन) - २४ पदे

अधिकारी (सुरक्षा) - १४ पदे

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख - १४ फेब्रुवारी २०२३

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ मार्च २०२३

वयोमर्यादा

उमेदवाराचे कमाल वय २८ वर्षांच्या आत असावे.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये गट चर्चा आणि/किंवा निवड समितीसमोर मुलाखत असेल.

वरिष्ठ अधिकारी (F&S) : निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक क्षमता चाचणी (PET) आणि निवड समितीसमोर मुलाखत यांचा समावेश असेल.

अधिकारी (सुरक्षा) : निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक क्षमता चाचणी (PET) आणि निवड समितीसमोर मुलाखत यांचा समावेश असेल. PWD असेल तर, PET मधून सूट दिली जाईल.

वर नमूद केलेली निवड प्रक्रिया तात्पुरती आहे. कंपनीच्या प्रशासकीय/व्यावसायिक आवश्यकतांनुसार निवड प्रक्रिया बदलू शकते.

पगार

वेतनमान दरमहा ९० हजार ते २ लाख ४० हजार असेल.

अर्ज कसा करायचा ?

स्वारस्य असलेले उमेदवार https://gailebank.gail.co.in/recruitmentSystem/user या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क

Gen/OBC/EWS: २००/- आणि SC/ST/PWD: ०/-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT