girls in class google
एज्युकेशन जॉब्स

मुलींचे गणित सुधारतेय; मुलांच्या बरोबरीने प्रगती - युनेस्कोचा अहवाल

या अहवालात १२० देशांतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले आहे.

नमिता धुरी

मुंबई : आजही अनेक क्षेत्रांत स्त्री-पुरूष असमानता दिसत असताना युनेस्कोने जाहीर केलेल्या एका अहवालावरून महिलांविषयी सकारात्मक माहिती समोर आली आहे. UNESCO's Global Education Monitoring Report अनुसार गणित विषयात आता मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत. या अहवालात १२० देशांतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले आहे.

अहवालातील माहितीनुसार सुरूवातीची काही वर्षे गणित विषयात मुले मुलींपेक्षा अधिक प्रगती करताना दिसतात; मात्र हळूहळू हे अंतर कमी होत जाते. गरीब देशांमध्येही ही असमानता नष्ट झाली आहे. काही देशांमध्ये हळूहळू फरक पडत आहे.

जुन्या परंपरांमुळे मुलींमधील गणित शिकण्याची इच्छा कमी होण्याची शक्यता असते; मात्र तरीही इयत्ता आठवीमध्ये मुलींच्या बाबतील मलेशियामध्ये ७ टक्के, कंबोडियामध्ये ३ टक्के, काँगोमध्ये १.७ टक्के, फिलिपिन्समध्ये १.४ टक्के इतके अंतर आहे.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात मुलींची गणितातील प्रगती वाढताना दिसत असली तरीही जगात गणितात सर्वाधिक चांगली प्रगती करणाऱ्यांमध्ये अजूनही मुलांचाच समावेश आहे. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांतील देशांमध्ये माध्यमिक शाळांतील मुली विज्ञानात अधिक गुण प्राप्त करत आहेत. तरीही मुलींचे विज्ञान क्षेत्रातील करिअर निवडण्याचे प्रमाण कमी आहे. याचाच अर्थ परंपरावादी दृष्टिकोनाचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर होत आहे.

प्राथमिक शिक्षणात सर्वात जास्त असमानता सौदी अरेबियामध्ये आहे. इथे इयत्ता चौथीतील ७७ टक्के मुली आणि ५१ टक्के मुले शिक्षणातील किमान क्षमता प्राप्त करतात. हे अंतर थायलंडमध्ये १८ टक्के, डोमिकिमन गणराज्यामध्ये ११ टक्के आणि मोरोक्कोमध्ये १० टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: ''जेवढी ताकद आहे तेवढी वापरा..'' कोर्टाने दिलेली वेळ संपल्यानंतर बच्चू कडूंची भूमिका

Latest Marathi News Live Update : फुलंब्री तालुक्यात शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

अखेर अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या कृष्ण रूपाच रहस्य समोर; का घेतलेलं अभिनेत्रीने श्रीकृष्णाचं रूप?

Heart Health Tips: हृदय राहील कायम निरोगी, फक्त जीवनशैलीत करा हे ५ छोटे बदल!

काही असतात सल्लागार तर काहींकडे भविष्य जाणण्याची ताकद ! जन्मनक्षत्रानुसार जाणून घ्या तुमचं Hidden Talent (भाग 1)

SCROLL FOR NEXT