Government job google
एज्युकेशन जॉब्स

Government job : NABARDमध्ये नोकरीची संधी; एवढा मिळणार पगार

अर्जाची प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे.

नमिता धुरी

मुंबई : नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने विकास सहाय्यक च्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार नाबार्डच्या nabard.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे विकास सहाय्यकांची एकूण १७७ पदे भरली जातील. अर्जाची प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे. (NABARD Recruitment 2022)

एकूण पदे - १७७

विकास सहाय्यक – १७३ पदे

विकास सहाय्यक हिंदी – ४ पदे

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - १५ सप्टेंबर २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० ऑक्टोबर २०२२

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३२ वर्षे दरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता

विकास सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग उमेदवारांसाठी ५०% गुणांची आवश्यकता नाही.

जे उमेदवार विकास सहाय्यक (हिंदी) पदांसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे आणि अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून हिंदीचा अभ्यास केलेला असावा. या पदासाठी SC, ST आणि अपंग प्रवर्गासाठी ५० टक्के गुणांची सक्ती नाही.

अर्ज फी

या पदांसाठी अर्ज करणार्‍या सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ४५० रुपये भरावे लागतील, तर SC, ST आणि भिन्न अपंग श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५० रुपये भरावे लागतील.

पगार

पगार म्हणून निवडलेल्या उमेदवारांना ३२ हजार रुपये मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT