Sarkari Naukri esakal
एज्युकेशन जॉब्स

पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी! 'येथे' करा 9 नोव्हेंबरपर्यंत अर्ज

पदवीधर तरुणांना सरकारी नोकरीची संधी! 'येथे' करा 9 नोव्हेंबरपर्यंत अर्ज

श्रीनिवास दुध्याल

या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 9 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सोलापूर : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) सरकारी नोकरीसाठी (Government job) तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (Uttar Pradesh Power Corporation Limited - UPPCL) ने ग्रॅज्युएशन पदवी आणि संगणकाचे ज्ञान असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. UPPCL ने सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी (ARO) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 14 पदांची भरती करायची आहे. या पदांसाठी आवश्‍यक शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्‍यक आहे. याव्यतिरिक्त उमेदवारांना 30 WPM च्या गतीसह संगणकात हिंदी टायपिंग करता येणे आवश्‍यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 9 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत पोर्टल @upenergy.in वर जाऊन अधिसूचना तपासू शकतात.

'या' तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरवात : 18 ऑक्‍टोबर 2021

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर 2021

  • ऑनलाइन अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्‍टोबर ते 11 नोव्हेंबर 2021

  • परीक्षेची तात्पुरती तारीख : डिसेंबर 2021 चा दुसरा आठवडा

UPPCL ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी (ARO) च्या एकूण 14 पदांची भरती केली जाईल. यामध्ये 14 रिक्त पदांपैकी 09 अनारक्षित प्रवर्गासाठी, 03 इतर मागास जातींसाठी, 02 अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 40 वर्षे असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.

ही असेल फी

सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना फी म्हणून 1180 रुपये भरावे लागतील. त्याच वेळी, SC/ST साठी 826 रुपये शुल्क असेल, तर PH (दिव्यांग) साठी 12 रुपये भरावे लागतील. शुल्क डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / नेट बॅंकिंग / ई-चलनद्वारे भरता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

'यदा- कदाचित'वर झालेली बंदी घालण्याची मागणी पण आनंद दिघे नाटक पाहायला आले आणि... नेमकं काय घडलेलं?

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: परंडा येथे दोन गटात दगडफेक, आमने सामने आल्याने नगरपालिकेमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT