India Post
India Post Canva
एज्युकेशन जॉब्स

इंडिया पोस्टमध्ये नोकऱ्या! दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

परीक्षा कधी व कोठे होईल याची माहिती उमेदवारांना देण्यात येईल. ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार नाही त्यांना कोणतीही माहिती दिली जाणार नाही.

सोलापूर : वेगवेगळ्या मंडळांचे निकाल येत आहेत आणि त्यांच्याबरोबर नोकऱ्यांच्या संधीही प्राप्त होत आहेत. त्याचबरोबर इंडिया पोस्टमध्ये (Indai Post) सरकारी नोकरीची (Government Job) संधी मिळणार आहे. या नोकऱ्यांच्या जागा महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये (Maharashtra Postal Circle) निघाल्या आहेत. यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 32 पदे भरली जाणार आहेत. ही पदे स्टाफ कार ड्रायव्हर (मूळ ग्रेड) (सामान्य केंद्रीय सेवा श्रेणी सी, नॉन-राजपत्रित, गैरमंत्री) साठी आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, हलक्‍या व अवजड मोटार वाहनांसाठी वाहन चालविण्याचा परवाना असणारे दहावी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. मोटार मेकॅनिकलचे ज्ञान असलेले आणि कमीतकमी तीन वर्षे जड आणि हलक्‍या मोटार वाहनांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (Government job opportunity for tenth pass candidates in India Post-ssd73)

महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती 2021 च्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास उमेदवाराचे वय किमान 18 आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा 27 वर्षे आहे. शासकीय निकषानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची सवलत असेल. वेतनाबाबत बोलायचे झाल्यास उमेदवारांना 19 हजार 900 रुपये (वेतन मॅट्रिक्‍समधील 7 सीपीसीनुसार लेव्हल 2) मासिक वेतन मिळेल.

उमेदवार आवश्‍यक कागदपत्रांसह वरिष्ठ व्यवस्थापक (जेएजी), मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई - 400018 या पत्त्यावर स्पीड पोस्ट / रजिस्टर्ड पोस्टाच्या माध्यमाने 9 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज पाठवू शकतात. निवडीबद्दल बोलायचे झाल्यास, गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट होईल. हलकी व जड वाहने चालवून दाखवावी लागेल. परीक्षा कधी व कोठे होईल याची माहिती उमेदवारांना देण्यात येईल. ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार नाही त्यांना कोणतीही माहिती दिली जाणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT