Indian Army Jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

Indian Army Jobs : दहावी पास झालेल्यांसाठी इंडियन आर्मीत नोकरीची संधी

नोकरीसाठी ११ मार्चपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही हाऊसकिंपीगच्या कामात तरबेज असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आर्मी कॅंपच्या मुख्यालयात मल्टी टास्किंग स्टाफच्या पदावर भरतीसाठी अर्ज (Job) मागवले आहेत. इंडियन आर्मी एमटीएस भर्ती २०२२ साठी ११ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. सूचनेनुसार, MTS च्या 7 पदांसाठी इंटिग्रेटेड हेडक्वार्टर MOD (आर्मी) कॅम्प, डिफेन्स सिव्हिलियन रिक्रूटमेंट अंतर्गत भरती केली जाईल.

अशी करा प्रक्रिया

एमटीएस(सफाईवाला)- ७ पदे

अनारक्षित- ५ पद

ओबीसी- २ पद (एक पद माजी सैनिकासाठी राखीव)

पगार- एमटीएस (सफाईवाला) पदासाठी दर महिना १८,००० हजार रूपये पगार मिळेल.

वय- उमेदवाराचे वय १८ ते २५ दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हाऊसकिपिंगची कामे करण्यात निपुण असावे. तसेच कोणत्याही नागरी/शासकीय कार्यालयात सहा महिन्यांचा कामाचा अनुभव असावा.

अशी होईल निवड- एमटीएस पदासाठी योग्य उमेदवाराची निवड ही स्क्रीनिंग आणि लेखी चाचणी/कौशल्य चाचणीनंतर केली जाईल. उमेदवारांची तपासणी इयत्ता 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित असेल.

असा करा अर्ज- या नोकरीसाठी अर्ज ऑफलाइन करायचा आहे. राजपत्रित अधिकाऱ्याकडून आवश्यक कागदपत्रांवर सही घेऊन त्या छायाप्रतीसह अर्ज लिफाफ्यात घालून अर्ज - HQ Mod (Army) Camp, Rao Ram Marg, NEW Delhi-110010 या पत्त्यावर पाठवायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात गारठा वाढणार! उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट, तर मुंबई-पुणेही गारठलं; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mahabaleshwar News:'खासदार शाहू महाराजांनी दिली प्रतापगडावर भेट'; शिवभक्तांची गडावर मोठी गर्दी, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा

जीवघेण्या उठाबशा !

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

SCROLL FOR NEXT